युवक काँग्रेस अक्कलकोट तालुका अध्यक्ष बाबासाहेब पाटील यांचे राजीनामा नामंजूर
जिल्हा जिल्हाध्यक्षांनी केले लोकसभेतील कामाचे कौतुक
अक्कलकोट ( प्रतिनिधी )
युवक काँग्रेस अक्कलकोट तालुका अध्यक्ष बाबासाहेब पाटील यांचे राजीनामा नामंजूर करण्यात आल्याचे पत्र जिल्हा अध्यक्ष सूनंजय पवार यांनी दिले
अक्कलकोट तालुक्याचे युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष झाल्यापासून युवकांना सोबत घेऊन तालुक्यातील युवा फळी एकत्र संघटित करून तालुक्यात मरगळलेल्या अवस्थेत असलेले काँग्रेस पक्षला ऊर्जा निर्माण करण्यासाठी काम बाबासाहेब पाटील यांनी केले असून लोकसभेच्या निवडणुकीत युवक काँग्रेसने अक्कलकोट तालुक्यात चांगल्या प्रकारे काम केले असून बाबासाहेब पाटील यांनी त्याच्या टीमला सोबत घेऊन चांगल्या प्रकारे मेहनत घेतल्याने पक्ष मजबूत होत आहे
बाबासाहेब पाटील व त्याच्या सोबतचे युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी यांचे कुठलेही काम , अडीअडचणी सोडविण्यासाठी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे व मी स्वतः तुमच्या तुमच्यासोबत असल्याचे जिल्हाध्यक्ष सुनंजय पवार यांनी म्हणाले
यावेळी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना बाबासाहेब पाटील म्हणाले की,
काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील असून यापुढे युवकांचे कुठलेही समस्या अडीअडचणी सोडविण्याचे आश्वासन माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे व जिल्हा अध्यक्ष सुनंजय पवार यांनी दिले असून येत्या काळात युवक काँग्रेस विधानसभा निवडणुकीत सर्व पदाधिकारी आणि आमचे टीम कामाला लागले आहे
यावेळी मा. मंत्री. सिद्धाराम म्हेत्रे, जिल्हाध्यक्ष सुनंजय पवार, जि.प सदस्य मल्लिकार्जुन पाटील, युवक काँग्रेस अध्यक्ष बाबासाहेब पाटील, सुनील खवळे,विनीत पाटील, मुजीप नदाफ, कृषी उत्पन्न बाजार समिती दुधनी संचालक इराण्णा धसाडे, राहुल साळुंखे,अयाज चंदनवाले, आकाश निंगदल्ले, राहुल मोरे, नितीश राठोड, संदीप चव्हाण,वसीम कुरेशी, कशीनाथ लोड्डेनौर, रतन बिराजदार यासह युवक काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते