काजीकणबस गावातील पी एस आय दिव्या कांबळे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड
समाजाच्या दृष्टिकोनातून समाजाचा मान सन्मान उचवणारी गोष्ट म्हणजे अक्कलकोट तालुक्यामधून बौध्द महिला प्रथमच काजीकणबस गावातील PSI दिव्या रामराज कांबळे (चंदनशिवे) यांची पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन
माणसाकडे जिद्द चिकाटी , मेहनत ,कष्ट , लहानपणापासून वडिलांची छाया हरपली असताना सुद्धा घरातील दोन भावाडं आई या छोट्याशा परिवारा मधून आलेल्या दिव्या ताई परिस्थितीवर प्रत्येक गोष्टीमध्ये मात करत आली स्वतःच्या मनामध्ये ध्येय आई वडील भावाने दिलेले संस्कार आणि पती ने दिलेली सर्वात मोठी संधी या सर्व गोष्टीच्या बळावरती जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीचा त्याग करून नुकतेच नविन वैवाहिक जीवनामध्ये सुखी संसार करू शकले असती चुल आणि मूल या गोष्टींमध्ये बंदिस्त राहून आपल्या आपत्यांना जन्म दिला असता पण ह्या सर्व गोष्टी बाजूला करून घरातील सासू आई-वडील समाज परिवारामधील अनेक लोक काय बोलतील या गोष्टीकडे दुर्लक्ष करून जीवनामध्ये खूप मोठा त्याग करून पतीने आपल्यावर दाखवलेला विश्वासाला सार्थक करून दाखवणारी पहिली अक्कलकोट तालुक्यामधून महिला बौद्ध पीएसआय माझ्या माहितीप्रमाणे होऊन दाखवल्या ही खूप अभिमानाची गोष्ट आणि समाजाचा मान सन्मान उंचावणारी गोष्ट आहे करत असताना अनेक वाईट प्रसंगांना सुद्धा सामोरे जावे लागलं आणि यामध्ये सर्वात मोठा वाटा सिंहाचा वाटा म्हणजे त्यांचे पती मुंबई पोलीस रामराज कांबळे यांचाच आहे विवाह झाल्यानंतर एखाद्या स्त्रीचं फारच स्वप्न मोठं काही नसतं कुठे असलं तरी त्यांना पतीने न दिलेल्या स्वातंत्र्यामुळे ते स्वप्न बंदीस्त केले जाते पण रामराज कांबळे यांने आपल्या पत्नीला पाहिजे ते परिपूर्णपणे स्वातंत्र्य दिले पाहिजे त्या सुख सुविधा दिल्या घरामध्ये सर्व गोष्टीची परिस्थिती असताना सुद्धा घरामध्ये फक्त MPSC चे पुस्तक , वाचनाची आवड बातम्या, जनरल नॉलेज आशा गोष्टी वरती चर्चा सुसंवाद , अशा सर्व गोष्टी पतीच्या माध्यमातून झाल्या आणि या सर्व गोष्टीची जाणीव दिव्या ताईंना होती लहानपणापासूनच जिद्द चिकाटी , तुळजापूर तालुक्यातील होनाळा , गावात आपलं प्राथमिक शिक्षण पूर्ण झाला आणदुर उच्च माध्यमिक महाविद्यालय तुळजापूर तालुका या ठिकाणी हॉस्टेलला राहून पंधरावी पर्यंत शिक्षण पूर्ण झाले दोन जुळे बंधू एक आर्मी तर दुसरा इंजिनियर आणि आई असा हा छोटासा परिवार अशा छोट्याशा परिवारामधून विवाह बंधनात बंदिस्त झाल्या तरीसुद्धा जिद्द चिकाटी आणि ध्येय या गोष्टी स्वतःच्या मनापासून कधीच विसरू दिल्या नाहीत लहानपणापासून शाळेमध्ये टायलेंट परिस्थिती जाणीव अशा सर्व गोष्टी त्यांना घडवण्यासाठी होत्या म्हणून म्हणून ते आज घडल्या ह्या सर्व गोष्टी घडण्यासाठी सुद्धा कित्येक दिवस विवाह होऊन हि प्रत्येक स्त्रीला मातृत्व प्राप्त होण्याची इच्छा स्वप्न असतात तु सुध्दा त्याग कराव्या लागल्या कित्येक वर्षे त्या जोडप्या नी त्याग सहजा सहजी प्रत्येक स्त्रियांना प्रत्येक पुरुषांना जमत असं मुळींच नाही ते फक्त बोटावर मोजण्या इतकेच लोक असतात त्यापैकी हे दोघे जण पती पत्नी होते यशापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक संकटांना सामोरे जाऊन खूप उंच भरारी घेण्यासाठी हा सर्व प्रंपच चालु होता कोण काय बोलेल या गोष्टीकडे दुर्लक्ष करून फक्त संघर्ष चालु होता शिक्षणाची गोडी निर्माण होतीच त्या सर्व गोष्टीच्या जीवावरती जीवनामध्ये सफल होता येते त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे दिव्या ताई लहानपणापासून पाहिलेला स्वप्न खरं करून दाखवले आहे जयंतीच्या निमित्ताने समाजातील चांगल्या उच्च पदावर नोकरदार यांचा सत्कार अक्कलकोट तालुक्यातील PSI निलेश भागव सर यांच्या हस्ते करण्यात आला होता त्यामध्ये मुंबई पोलीस रामराज कांबळे यांच्या अनुपस्थितीत त्यांची पत्नी दिव्या कांबळे यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला होता त्यावेळेस सत्कार करत असताना @+91 81084 35454 सर , मी तुम्हाला आवर्जून उल्लेख केला होता हे मुंबई पोलीस रामराज कांबळे यांची पत्नी आहे ते एमपीएससी यूपीएससी तयारी करतात Psi च्या सध्या रेज मध्ये आहेत आणि काल त्या पीएसआय ची परिक्षा उत्तीर्ण झालेल्या हे खूप अभिमानाची गोष्ट ग्रामीण भागातील लोकांसाठी आणि ग्रामीण भागातून आलेला प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आहे कोणता ही विद्यार्थीनीं इथपर्यंत पोहचणे खूप कठीण खडतर प्रवास असतो पण तो रस्ता पार करून यशस्वी होतात यासाठी जिद्द चिकाटी कष्ट अभ्यास आणि मोनबल वाढवणाऱ्या कुंटबाची पण खुप गरज असते हे तितकेच खंर आहे आणि या सर्व झालेल्या गोष्टीतून एकच सांगावेसे वाटतंय की जिथे संधी मिळते तिथे संधीचं सोनं करून दाखवण्याची क्षमता आहे आलेला संधीचा उपयोग करता आलं पाहिजे ध्येयवादी माणसं आपल्या ध्येय पर्यंत पोहचतात हे परत एकदा सिध्द झाले ताई तुम्ही केलेला संघर्षा बद्दल जेवढे कौतुक करावं तेवढं कमीच आहे यापुढे सुद्धा तुम्ही आपल्या पतीचं गावचं समाजाचा आणि तालुक्याचा असंच नाव रोशन करत राहो हिच तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा सदिच्छा देतोय आणि अजून तुमच्या प्रेरणादायी प्रवास मुळे आपल्या गावातून अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी घडतील आणि तुम्ही घडवण्याचं काम कराल योग्य ते मार्गदर्शन कराल यात काहीही शंका नाही पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा आणि PSi ची परिक्षा उत्तीर्ण झालेल्या बद्दल यश प्राप्त करून दिल्याबद्दल अभिनंदन समाजाचे नाव रोशन करणारी कौतुक स्पदांची उंच भरारी आहे
🇮🇳जय हिंद जय भारत🇮🇳
✍🏻अविनाश सोपान गायकवाड,