माता रमाई भिमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मैत्री ग्रुप महाराष्ट्र राज्य ची वार्षिक बैठक संपन्न
सोलापूर l प्रतिनिधी
त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त मैत्री ग्रुपच्या वतीने रमाई जयंती उत्सव मोठ्या उत्साहात आणि भव्य दिव्य स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे.
त्यानिमित मैत्री ग्रुपच्या मंडळाची वार्षिक बैठक शनिवार दिनांक 30 नोव्हेंबर 2024 रोजी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे आयोजित करण्यात आली होती.
या वेळी सदर बैठकीला प्रमुख उपस्थिती म्हणून मैत्री ग्रुप चे मार्गदर्शक समाजरत्न अजित भाऊ गायकवाड, डॉ बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती मंडळाचे अध्यक्ष शिवम भैय्या सोनकांबळे,माजी नगरसेवक अरुण मामा भालेराव, आयडॉल्स ग्रुपचे संस्थापक कुणाल भैय्या बाबरे, युवानेते सोनू दोड्डयानुर, ऋषी लोखंडे, सुमित शिवशरण, भाग्यवंत भांगे, विश्वदीप मालक बनसोडे हे उपस्थित होते,
प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांनी उपस्थित तमाम युवकांना मार्गदर्शन केले. याच वेळी रमाई जयंती साजरी करण्यासाठी मैत्री ग्रुपचे नुतुन पदाधिकात्यांची निवड करण्यात आली . या वेळी मैत्री ग्रुप रमाई जयंती उत्सवा च्या अध्यक्ष पदी सिद्धार्थ (आण्णा) शिवशरण यांची एकमताने निवड करण्यात आली. या वेळी मैत्री ग्रुप चे सर्व सभासद,मित्रपरिवार, मोठया संख्येने उपस्थित होते.