पारदर्शक व निष्पक्षपाती चौकशीसाठी पदभार काढून घ्या : महांतेश्वर कट्टीमनी
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा निर्णय;नियमबाह्य बदल्यांच्या चौकशीसाठी त्रिस्तरीय समिती
सोलापूर-पुणे विभागीय आयुक्तांच्या अधिकाराचा गैरवापर करत अक्कलकोट तालुक्यात मोठ्या प्रमाणात नियमबाह्य प्रतिनियुक्त्या केल्याची तक्रार मागासवर्गीय संघटना आणि सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने करण्यात आलेली होती.नियमबाह्य प्रतिनियुक्त्या रद्द करत वादग्रस्त प्रभारी गटशिक्षणाधिकारी प्रशांत आरबाळे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आलेली होती.सदर तक्रारारीची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी नियमबाह्य बदल्यांच्या चौकशीसाठी त्रिस्तरीय समिती स्थापन केली असल्याची माहिती मागासवर्गीय संघटनेचे तालुकाध्यक्ष महांतेश्वर कट्टीमनी यांनी दिली.
तक्रारारीचे स्वरूप आणि गांभीर्य पाहता प्रभारी गटशिक्षणाधिकारी हे आपल्या हाताखालील कर्मचाऱ्यांवर दबाब आणून पारदर्शक आणि निष्पक्षपाती चौकशीसाठी अडथळा ठरू शकतात.पारदर्शक आणि निष्पक्षपाती चौकशीसाठी वादग्रस्त प्रभारी गटशिक्षणाधिकारी यांचा पदभार तातडीने काढून घेऊन चौकशी करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आलेली आहे.पदभार न काढता चौकशी करणे हा केवळ चौकशीचा फार्स ठरणार असल्याचे भीती संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आली.
चौकट
चौकशी समितीची व्याप्ती वाढवा
सातत्याने प्राप्त गंभीर स्वरूपाच्या तक्रारींमुळे चौकशी समितीची व्याप्ती वाढवून अन्यही गंभीर विषयांचा समावेश करण्याची मागणी यावेळी करण्यात आलेली आहे.तसेच दारिद्र्यरेषेखालील मागासवर्गीय मुलींचा भत्ता वाटप न करणे,अपात्र शाळेवर पात्र मुख्याध्यापक यांचे वेतन काढून काढणे,नियमबाह्य समायोजन,समाज माध्यमांत शिक्षकांची प्रतिमा मलिन करणे,समानीकरण धोरणाची पायमल्ली,नियमबाह्य प्रभारी केंद्रप्रमुख नियुक्ती या व अन्य गंभीर तक्रारी पाहता केवळ अनियमित बदल्यांची चौकशी हे हिमनगाचे टोक असणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष महांतेश्वर कट्टीमनी यांनी दिली.
त्रिस्तरीय समिती सदस्य यांचा समावेश
सुलभा वठारे-शिक्षणाधिकारी योजना-अध्यक्ष
रुपाली भावसार-उपशिक्षणाधिकारी-सदस्य
हरीष राऊत-विस्तार अधिकारी-सदस्य
चौकट
गट शिक्षण अधिकारी यांनी 21 नियमबाह्य बदल्या केल्या आहेत तसेच बदल्यांचा आदेश देताना गटविकास अधिकारी यांच्याकडे टिपणी ठेवून बदल्या केले आहे. बदल्या रद्द करताना गटविकास अधिकारी यांना अंधारात ठेवून बदल्या रद्द केले आहे. चौकशी करताना यांचा पदभार काढन्याची मागणी निवेदना द्वारे सिईओ संदीप कोहिनकर यांच्याकडे केली आहे.