सांगवी खु येथे पूरग्रस्तांना मदत
पंढरपूरचे शिक्षक विद्याधर भोसले यांच्या कडून किट वाटप
अक्कलकोट/प्रतिनिधी
सध्या महाराष्ट्रासह सोलापूर जिल्ह्यात पावसाने धुमाकुळ घातला असून, अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर धरणाच्या वरच्या भागात धुवाधर पाऊस पडल्याने खालच्या् भागात मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले असून त्याच पुराच्या पाण्याचा फटका बोरी नदीच्या तोंडाला असलेले सांगवी खु गावाला बसला त्या दरम्यान 15 ते 20 घरे पाण्याखाली गेली असून, त्यांना तातडीने सुरक्षित स्थळी हळविण्यात आले. त्यांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांच्या जीवना आवश्यक वस्तूंची नासधूस झाली हे प्रसारमध्यमाच्या माध्यमातून कळताच पंढरपूर येथील शिक्षक श्री विद्याधर भोसले यांचे सुपुत्र महाराष्ट्रातील नामवंत आय कॅन ट्रेनिंग अकॅडमी चे संचालक विवेक भोसले सर यांनी तात्काळ दैनंदिन जीवनाआवश्यक वस्तूचे किटचें वाटप केले. सदर किट मध्ये तांदूळ, शेंगदाणे, रवा, गोडेतेल, साबुदाणा, तूरडाळ, साखर, लालतिखट, हळद, तेल, चहापावडर, या वस्तूचा समावेश असून, त्यांच्या या अनमोल मदतीमुळे पूरग्रस्त कुटूंबाला मदतीचा हात मिळाला आहे.