शेतकरी कोमात तलाठी व कृषी सहाय्यक जोमात
शेतीचे पंचनामे करण्यासाठी शिरवळवाडी येथे तलाठी व कृषी सहाय्यक यांच्याकडून पैशाची मागणी
अक्कलकोट / प्रतिनिधी
अक्कलकोट तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे पिकांचे मोठे प्रमाणात नुकसान झाले आहे .नुकसान झालेले शेतीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शासनाने घोषणा केली असून त्या प्रमाणे तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करण्यात येत आहेत.परंतु शिरवळवाडी येथील शेतीचे ,शेत बांदाचे व शेती खरडून गेलेल्या शेतीचे पंचनामे करण्यासाठी तलाठी व कृषी सहाय्यक हे अर्ज दिलेल्या शेतकऱ्यांना पंचनामा करण्यासाठी टाळाटाळ करून पैशांची मागणी करत आहेत पैसे नाही दिल्यामुळे पंचनामे करण्यास टाळाटाळ करत आहेत अर्ज दिलेल्या शेतकऱ्यांनि पंचनामे करण्यासाठी विचारल्यावर अर्जा मधी त्रुटी कडचे उडवाउडवीचे उत्तर देत आहेत एजंट मार्फत पैशाची मागणी करत आहेत असे शेतकरी वर्गात चर्चा सुरू असून जे शेतकरी पैसे दिले आहेत त्यांचे पंचनामे करण्यात येत आहेत .शेतकऱ्यावर आस्मानी संकट कोसळे असताना तलाठी व कृषी सहाय्यक यांच्याकडून पैशाची मागणी करून पिळवणूक होत आहे . तलाठी व कृषी अधिकारी यांना तुम्ही शेतकऱ्यांना पैशाची मागणी कश्यासाठी करत आहात असे विचारल्यास दोन्ही अधिकारी दमदाटी करून तुमच्या विरुद्ध गुन्ह नोंद करण्याची धमकी देत आहेत ,अश्या अधिकाऱ्यांमुळेच शेतकरी देशोधडीला मिळत आहे . अशा अधिकाऱ्यावर वरिष्ठ लक्ष देणार का? या दोन्ही अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येणार का? असे अनेक प्रश्न शेतकरी वर्गात उपस्थित होत आहेत.