जेऊर जि.प.गटातून निजपा गायकवाड यांना उमेदवारी देण्याची कार्यकर्त्यांनी मागणी
अक्कलकोट प्रतिनिधी
जेऊर जिल्हा परिषद राखीव झाल्याने उमेदवारी मिळवण्यासाठी भारतीय जनता पक्षातील इच्छुकांमध्ये चांगलीच चढाओढ लागली आहे. पक्षाकडून मलाच पसंती आहे.असा संदेश श्रेष्ठीपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.इच्छुकांनी विविध कार्यक्रम,उपक्रम, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीवर भर देत आहे.
सुसंस्कृत,युवकांचे आधारस्तंभ,गोरगरिब लोकांच्या अडचणीला नियमित धावून जाणारे भाजपा अनु विभागाचे तालुकाध्यक्ष निजपा गायकवाड यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.जेऊर जिल्हा परिषद गट हे माजी जिल्हा परिषद सदस्य मल्लिकार्जुन पाटील यांचा आहे.परंतु यंदा मात्र राखीव झाल्याने एका मागासवर्गीय युवकांना संधी मिळावी.अशी कार्यकर्त्यांची परखड इच्छा आहे.निजपा गायकवाड यांना उमेदवारी दिल्यास जीवाचे रान करून कमळ फुलविण्याचा संकल्प कार्यकर्त्यांनी केला आहे.
जेऊर जिल्हा परिषद गटांमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत.कार्यकर्त्यांनी केलेल्या सर्वेक्षणात निजपा गायकवाड यांचे पारडे जड असल्याचे बोलले जाते.
निजपा यांना मोठी संधी असल्याचे स्पष्ट दिसत असल्याने कार्यकर्त्यांनी अधिकच जोमाने कामाला लागले आहेत.संजय गांधी निराधार कमिटीवर सदस्य असताना निजपा गायकवाड यांनी अनेक निराधारांना आधार देण्याचे महत्त्वाची भूमिका बजावली आहे.ते नेहमीच गरिबांच्या बाजूने उभे राहिले आहे.
अक्कलकोटच्या राजकीय पटलावर गोरगरिब व
सर्वसामान्य जनतेचे हित जपण्यासोबतच विकासाची दूरदृष्टी ठेवणारा सामान्य कार्यकर्ता म्हणून निजपा गायकवाड सर्वत्र परिचित आहेत.२०१५ मध्ये ग्रा.पं.
सदस्य म्हणुन निवडून आले.त्या दिवसापासून प्रत्येक गरीब लोकांचे कामे करण्यास सुरुवात केली.अनंत अडचणी आल्या. खचून न जाता, अडचणीवर मात करत ते सामाजिक, राजकीय क्षेत्रात सक्रिय आहे.
त्यांच्या कामाचे कार्य कौशल्य पाहून विद्यमान आमदारांनी निजपा गायकवाड यांना अनुसूचित जाती सेल’चे तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे.
शासनाचे अनेक योजनेची माहिती जनतेपर्यंत पोहोचण्याचे काम केले.शेळी,गाय,कोंबडी,संसारिक भांडी,गॅस,शिलाई मशीन,शेतकऱ्यांना अवजारे असे अनेक शासनाच्या विविध योजनाचे लाभ लाभार्थ्यांना मिळून दिले.संजय गांधी वयोवृद्ध दिव्यांग अशा गोरगरीब व्यक्तींना शासनाच्या योजनेची लाभार्थ्यांना मिळून दिले आहे.राजकारणापलीकडे जाऊन मैत्री जपणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये निजपा गायकवाड यांचे नाव आदरपुर्वक घेतले जाते.गोरगरिब मजुर,कामगार व सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी अहोरात्र झटणारा एक ध्येयवेडा कार्यकर्ता आहे.गेल्या अनेक वर्षापासून भाजपाचे एकनिष्ठ व प्रामाणिक अशी ओळख आहे.
पक्षासाठी संपूर्ण वेळ देणारा व मागासवर्गीय कार्यकर्त्यांना निजपा गायकवाड यांना भाजपकडून उमेदवारी मिळावी म्हणून कार्यकर्त्यांनी प्रखर इच्छा व्यक्त केली आहे.’अभी नही तो कभी नही’,निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी चालून आली आहेत.या संधीचे सोनं व्हावं अशी कार्यकर्त्यांनी इच्छा आहे.








