हन्नूर येथील अनंत चैतन्य प्रशालेत आदर्श शिक्षिका फिरदोस सय्यद यांचा सत्कार
अक्कलकोट ( प्रतिनीधी )
महर्षि विवेकानंद समाजकल्याण संस्था अक्कलकोट संचलित, अनंत चैतन्य माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशाला, हन्नूर येथे नवरात्रिनिमित्त ” नारी देशाचा अभिमान, करु या नारी शक्तीचा सन्मान ” या उपक्रमांतर्गत वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवून, कर्तव्यपूर्ती करून नावलौकिक प्राप्त केलेल्या महिलांचा सन्मान प्रतिदिवशी करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आजरोजी जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा, हन्नूर येथील उपक्रम व कृतीशील शिक्षिका सौ. फिरदोस सय्यद यांना तालुका पंचायत समिती शिक्षण विभाग, अक्कलकोट यांच्या वतीने आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त झाल्याने प्रशालेच्या प्रवेश, सहल क्षेत्रभेट विभाग प्रमुख सौ. मृदुलादेवी स्वामी यांच्या हस्ते शाल, हार व पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले. व याच जि. प. शाळेच्या दुसऱ्या कर्तव्यदक्ष शिक्षिका सौ. संध्याराणी ओमन यांचाही प्रशालेच्या सांस्कृतिक विभाग सहाय्यिका सौ. मल्लम्मा चप्पळगाव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रशालेचे पर्यवेक्षक श्री. अशोक साखरे सर यांनी ” कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन” या संस्कृत श्लोकाप्रमाणे आपण आपल्या क्षेत्रात निष्ठेने व प्रामाणिक, निस्वार्थ भावनेने काम करत राहिल्यास फळ आपोआप मिळते व आपल्या चांगल्या कार्याची निश्चितपणे दखल घेतली जाते.हे फिरदोस सय्यद याचे उत्तम उदाहरण आहेत असे त्यांच्या मनोगतातून व्यक्त केले. यावेळी प्रशालेचे सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. अप्पासाहेब काळे, जेष्ठ शिक्षक श्री. ज्ञानदेव शिंदे, सरदार मत्तेखाने, सुरेश जाधव, निंगप्पा बिराजदार व समस्त शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन सौ. स्वप्नाली जमदाडे यांनी केले तर आभार सौ. मृदुलादेवी स्वामी यांनी मानले.