बेंगळुरू येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात श्री एस एस शेळके प्रशाला वागदरीचे दैदिप्यमान यश ;
प्रशालेच्या पवन चोळ्ळे व शुभम हुलगेरी यांच्या वैज्ञानिक उपकरणाला मिळाला प्रथम क्रमांक….
टाटा पावर लिमिटेड आणि अगस्त इंटरनॅशनल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बेंगळुरू येथे संपन्न झालेल्या ऊर्जा मिलान अंतर्गत राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात श्री एस एस शेळके प्रशालेतील इयत्ता आठवी मधील पवन शिवपुत्र चोळ्ळे व शुभम शिवानंद हुलगेरी या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या “सोलार ट्रॅकिंग सिस्टम” या वैज्ञानिक उपकरणाला (प्रोजेक्टला) महाराष्ट्र विभागातून प्रथम क्रमांक मिळाला आहे.
या स्पर्धेत महाराष्ट्रसह इतर 10 राज्यातील अनेक शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. महाराष्ट्रातील ही अनेक शाळेतील विद्यार्थ्यांची निवड या स्पर्धेसाठी झाली होती. त्यात पूर्ण महाराष्ट्रातून प्रथम क्रमांकाचे प्रोजेक्ट म्हणून शेळके प्रशालेतील या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रोजेक्टला मिळाले आहे.महाराष्ट्रातून प्रथम आल्याने डिसेंबर महिन्यात *नवी दिल्ली येथे राष्ट्रपती भवनामध्ये होणाऱ्या राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनासाठी पवन चोळ्ळे व शुभम हुलगेरी यांची निवड झाली आहे.
सदर विद्यार्थ्यांना विज्ञान शिक्षक प्रदीप पाटील, ईमाम कासिम बागवान, शिवशरण गवंडी, दत्तात्रय होटकर,शिवलिंगप्पा गंगा,बालाजी चौगुले,मल्लम्मा सोमेश्वर,आरती बिराजदार यांचे मार्गदर्शन लाभले.
सदर यश मिळविलेल्या या विद्यार्थ्यांचं संस्थेचे चेअरमन श्री बसवराज शेळके सावकार,संस्थेचे सर्व पदाधिकारी, प्राचार्य अनिल देशमुख,पर्यवेक्षिका शैलशिल्पा जाधव,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि ग्रामस्थांनी अभिनंदन केले व पुढच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.