कुरनुर धरणात पाणी सोडण्यात यावे अन्यथा संपूर्ण जिल्ह्यात तीव्र आंदोलन- रिपाइं नेते प्रा.राहुल रूही
अक्कलकोट ( प्रतिनीधी )
उजनीच्या पाण्यासाठी उपोषण करणाऱ्या उपोषणकर्ते रिपाइं अध्यक्ष अविनाश मडीखांबे यांच्या मागणीची तत्काळ दखल घेऊन कुरनुर धरणात पाणी सोडण्यात यावे अन्यथा संपूर्ण जिल्ह्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल असे रिपाइं नेते प्रा.राहुल रूही म्हणाले
संपूर्ण अक्कलकोट तालुका हा दुष्काळग्रस्त असताना पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झालेली असताना उजनी जलाशयातून अक्कलकोट तालक्याकरिता कुरनुर धरणात तत्काळ पाणी सोडण्यात यावे यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने अक्कलकोट तालुका अध्यक्ष अविनाश मडीखांबे यांच्या नेतृत्वाखाली अक्कलकोट तहसील कार्यालय येथे आमरण उपोषण सुरू असून आज उपोषणाचा चौथा दिवस असून उपोषणकर्ते अविनाश मडीखांबे यांची प्रकृती ढासळत चालली आहे तरी त्याच्या जीवितास काही झाल्यास होणाऱ्या परिणामाला प्रशासन जबाबदार असेल तत्काळ प्रशासनाने त्याच्या मागणीचा विचार करून उजनी जलाशयातून उद्ध पातळीवरील कुरनुर धरण्यात पाणी सोडण्यात यावे अन्यथा संपूर्ण जिल्ह्यात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी रिपाइं नेते प्रा
राहुल रुही यांनी दिला आहे पाण्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्यांचे सर्व तालुकावासिय आभारी आहेत सर्वांना सर्वकाही माहिती आहे जनता दूधखुळी नाही त्यामुळे शेतकरी व जनता याच्या सहनशक्तीचा अंत आता पाहू नका आणि वेळकधुपणा न करता तत्काळ पाणी सोडण्यात यावे आणि तत्काळ उपोषणकर्ते अविनाश मडीखांबे यांचे उपोषण सोडणवण्यात यावे अशी मागणी यावेळी प्रशासनाला राहुल रुहि यांनी केली आहे