गोगांव येथील शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी सुधीर जगताप
अक्कलकोट ( प्रतिनीधी )
जिल्हा परिषद शाळा गोगांव येथील शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी सुधीर बलभीम जगताप, उपाध्यक्षपदी शोभा शरणबसपा मुळजे यांचे बिनविरोध निवड करण्यात आले
जिल्हा परिषद शाळा गोगांव येथे पालक सभा घेण्यात आले यावेळी ग्रामपंचायत जेष्ठ सदस्य प्रदीप जगताप, उपसरपंच कमलाकर सोनकांबळे, शालेय व्यवस्थान समिती अध्यक्ष आकाश गायकवाड, मुख्याध्यापक दयानंद चोळे,महादेव चव्हाण सर,यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा घेण्यात आले यावेळी नवीन शालेय व्यवस्थापन समिती पुढील प्रमाणे गठीत करण्यात आले अध्यक्ष सुधीर जगताप, उपाध्यक्ष सौ. शोभा मुळजे, सदस्य श्रीदेवी गायकवाड, राजेश्री धनशेट्टी, अस्मोद्दिन नदाफ, नामदेव बनसोडे, सौ. चंद्रकला गायकवाड, स्वाती निळ, मंजुनाथ जिरगे, शिक्षणतज्ञ ज्योती आलूरे, ग्रामपंचात प्रतिनीधी सौ. महादेवी होळे असे निवड करण्यात आले
यावेळी बोलताना कमलाकर सोनकांबळे म्हणाले की, नव्या अध्यक्ष व सर्व सदस्य यांनी शैक्षणिक गुणवंत वाढवण्यासाठी लक्ष दिले पाहिजे यासोबत जिल्हा परिषद शाळेमध्ये वेळोवेळी भेट देऊन शैक्षणिक अडचण, शिक्षक, विद्यार्थी यांचे समस्या जाणून घेतले पाहिजे व गोगावचे शैक्षणिक गुणवंत तालुक्यात येण्यासाठी सर्व शिक्षकांनी प्रयत्न केले पाहिजे त्यांना जे शैक्षणिक कामासाठी आवश्यक असणारे बाबी पूर्ण करण्यासाठी सदैव ग्रामपंचायत तयार आहे , मुलाचे भविष्य घडविण्याचे काम शिक्षकांनी केले पाहिजे, शाळेच्या विकास कामासोबत शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी सरपंच वनिता सुरवसे यांनी सतत प्रयत्नशील असतात येत्या काळात जिल्हा परिषद शाळेस ह्युमन सोशल डेव्हपमेंट असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष गोगांवचे सुपुत्र कैलास बनसोडे यांनी सी एस आर फडींग माध्यमातून शाळेस दहा संगणक व चाळीस पन्नास खुर्च्या भेट देणार आहेत, पालक व गावातील लोकांना विनंती आहे डिजिटल शाळा करण्यासाठी सर्वांनी मदत करावे यावेळी सूत्रसंचालन शंकर कारभारी सर यांनी केले आभार पुडलिक वाघमारे यांनी केले यावेळी नवीन अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य यांचे सत्कार मुख्याध्यापक दयानंद चोळे, प्रदीप जगताप, उपसरपंच कमलाकर सोनकांबळे यांनी केले, सरपंच सौ. वनिता सुरवसे यांनी नवीन अध्यक्ष ,उपाध्यक्ष, सदस्य यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिले यावेळी पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते