11.5 C
New York
Thursday, November 21, 2024

Buy now

spot_img

नळदुर्ग येथे अप्पर तहसिल कार्यालय सुरु करण्यासाठी प्रयत्न करणार : आमदार राणा

नळदुर्ग येथे अप्पर तहसिल कार्यालय सुरु करण्यासाठी प्रयत्न करणार : आमदार राणा

नळदुर्ग येथे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते दिव्यांग व्यक्तीना केले सायकलीचे वाटप

नळदुर्ग(एस.के.गायकवाड):
नळदुर्ग ता.तुळजापूर येथील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यामुळे नळदुर्ग हे पर्यटन स्थळ तर रामतीर्थ देवस्थान मुळे मिनी तीर्थक्षेत्र स्थळ म्हणून ओळखले जात असून नळदुर्ग हे अनेक गावांच्या केंद्र स्थानी असल्याने नळदुर्गला तहसील कार्यालय सुरु करणे गरजेचे आहे. तेंव्हा येथे आप्पर तहसील कार्यालय सुरू करण्यासाठी जाणीव पुर्वक प्रयत्न करणार आहे. तसेच नळदुर्ग शहरातील पाणी प्रश्न लक्षात घेऊन शासनाकडून ४३ कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना मंजुरी करून घेतली आहे. शिवाय केंद्र व राज्य सरकारच्या अनेक विकासात्मक योजना नळदुर्ग शहरात राबविण्यात येणार असल्याचे आमदार जगजितसिंहराण पाटील यांनी नळदुर्ग येते आयोजित कार्यक्रमात बोलताना सांगितले.
येथील ग्रामीण उपजिल्हा रूग्णालयाच्या प्रागणात केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व आधिकारिता मंत्रालयाच्या वतीने मंजूर दिव्यांग लाभार्थ्यांना भाजपा धाराशिव जिल्हा दिव्यांग विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात तुळजापूर विधानसभेचे आमदार राणा दादा यांच्या हस्ते सायकलीचे वाटप करण्यात आले. यावेळी आमदार राणा दादा बोलत होते.याप्रसंगी २९ दिव्यांग लाभार्थ्यांना सायकलीचे वाटप करण्यात आले.
यावेळी अँड. दिपक दाद अलुरे,नय्यर जहागीरदार, तेरणा आभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विक्रमसिंह माने,भीवा इंगोले,गणेश सोनटक्के,आनंद कंदले,उदय जगदाळे,संजय बताले धिमाजी घुगे,विलास राठोड, डॉ.ईस्माइल मुल्ला, महादेव पाटील,दत्ता राजमाने,भाजपा अपंग विभागाचे जिल्हा अध्यक्ष समाधान मते,विठ्ठल गायकवाड ,रिपाइं(आठवले)चे दुर्वास बनसोडे, एस.के.गायकवाड,भाजपा मेडिया सेल चे तुळजापूर तालुका अध्यक्ष किशोर धुमाळ सह कार्यकर्ते, लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सुनील बनसोडे यांनी केले.

- Advertisement -spot_img

Related Articles

Latest Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img