बैलगाडा शर्यतीची संस्कृती जपणारा अवलिया :- सागर दादा कल्याणशेट्टी
नोव्हेंबर 2015 ला हन्नूर ग्रामपंचायतची निवडणूक लागली. अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी. सरपंच पद हे आरक्षित झाले. निवडणूक तशी चुरशीचीच लागली. हनूर गावामध्ये विखुरलेल्या एकत्र नेत्यांनी. तिसरी आघाडी स्थापन करून. कल्याणशेट्टी गटाला हादरा देण्याचा ठरवलं. तत्कालीन सरपंच सचिन दादा कल्याणशेट्टी होते. अशातलाच. एम ए बी एड शिक्षण घेऊन. तरुणासोबत संघटनात्मक बांधणी करणारा. शिक्षित युवक राजकारणामध्ये प्रवेश केला. तो म्हणजे सागर दादा कल्याणशेट्टी होय. वडील सिद्धेश्वर कल्याणशेट्टी सर माजी प्राचार्य अनंत चैतन्य प्रशाला. त्यांना हन्नुर मधील राजकीय मुत्सद्दी असे त्यांची उपमा. अत्यंत प्रभावी. सरांच्या पावलावरती पाऊल ठेवत राजकीय गणित आखण्याचा विचार केला. शेतीची आवड शेतीला लागणाऱ्या अवजारांची गोळा करणे. त्यातला त्यात अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे बैल जोडी , महाराष्ट कर्नाटक राज्यातील कोठेही बैल जोडीचा बाजार भरतो . त्या गावाला जाऊन बैलजोडीची पारक करणे, खरेदी करणे हा आवडीचा छंद. चुरशी च्या लागलेल्या निवडणुकीमध्ये सगळ्या जागा जिंकून विरोधकाचा पाडशा पडला. आणि उपसरपंच पदावर ती विराजमान झाले. मी आमदाराचा भाऊ आहे. मी खूप जबाबदार व्यक्ती आहे. असं कोणताच गर्व मनाशी ठेवला नाही. माझं जे कर्तव्य आहे मला ते पार पाडायचा आहे. प्रत्येक युवकांना आपल्या भावाप्रमाणे वागवणारा हा युवा नेता. अत्यंत तळमळीने समाजकार्याचा वसा पुढे घेऊन जात आहे. शिक्षण महर्षी कै. पंचप्पा कल्याणशेट्टी सर, सिद्धेश्वर कल्याणशेट्टी सर, मल्लिनाथ कल्याणशेट्टी सर आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी यांचा वारसा पुढे घेऊन जाण्याचा कार्य या युवा नेत्याच्या हातामध्ये आहे. राजकारणापेक्षा तरुणांमध्ये नवचैतन्य निर्माण करून आपल्या समाजामध्ये असणारी संस्कृती म्हणजे बैलगाडी शर्यत. परंपरागत चालत आलेल्या संस्कृतीचा जतन करून आपण लोकांपर्यंत बैलगाडीची शर्यतीची. आवड निर्माण केली पाहिजे बैल जोड्या पळविले पाहिजे आणि आपली संस्कृती पळायला पाहिजे. हे धोरण उराशी बाळगून. बंदी घातलेल्या बैलगाडी शर्यतीच्या नियमाचा विचार ठेवून बैलगाडी शर्यतीचा शासकीय परवाना काढून हन्नुर गावामध्ये ऐतिहासिक बैलगाडी शर्यत करण्याचा निर्णय घेतला. त्याला हन्नूर केसरी असे नामकरण करण्यात आले. अक्कलकोट तालुक्यातील पहिली बैलगाडी शर्यत सागर दादा कल्याणशेट्टी यांच्या माध्यमातून झाली. हजारोच्या संख्येने येणाऱ्या श्रोत्यांनी सागर दादांचे अभिनंदन करू लागले. असे आजपर्यंत कधीच घडले नाही. सागर दादांनी करून दाखवले. गेल्या दोन-तीन वर्षापासून ही बैलगाडी शर्यत. मोठ्या थाटाने भरते.आपल्या संस्कृतीचा ठेवा. आपणच पुढे घेऊन गेला पाहिजे. ही भूमिका सागर दादाच्या विचारून दिसते. बैलगाडी शर्यतीच्या संस्कृतीचा जतन करणाऱ्या अवलियाचा म्हणजे सागर दादा कल्याणशेट्टी यांचा आज वाढदिवस त्यांच्या हातून याही पुढे उत्तम कार्य घडत राहो. त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी मनोकामना करतो.
पत्रकार गौतम बाळशंकर
ग्रामपंचायत सदस्य हन्नूर
संचालक तेजस्वी अर्थमूव्हर्स हन्नूर