22.4 C
New York
Wednesday, August 27, 2025

Buy now

spot_img

वागदरी मंडल मध्ये खरीप पिकाचे नुकसान भरपाई देण्याची मागणी

वागदरी मंडल मध्ये खरीप पिकाचे नुकसान भरपाई देण्याची मागणी

वागदरी ( प्रतिनिधी ) वागदरीसह परिसरातील गोगाव खैराट भुरीकवठे कीरनळी शिरवळवाडी सदलापूर शिरवळ या परिसरातील खरीप हंगामातील तूर उडीद मुग सोयाबीन कापूस मका भुईमूग ही सर्व पिके पूर्णपणे वाया गेल्याने या पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई करून देण्याची मागणी अक्कलकोट येथील तहसीलदार यांच्याकडे करण्यात आला. वागदरी परिसरात आश्लेषा नक्षत्राच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. गेल्या पंधरा दिवसापासून सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे या परिसरातील संपूर्ण शिवारात पाणी साचले आहे. शेती ना तलावाचे रूप आले आहे. परिसरातील संपूर्ण पिके पाण्याखाली पाण्याखाली गेल्याने खरीप हंगामा पूर्णपणे वाया गेला आहे. नगदी म्हणून ओळखले जाणारे खरीप हंगामातील सोयाबीन उडीद मूग मका कापूस ही पिके 100% वाया गेल्याने या परिसरातील शेतकऱ्यांची खूप मोठी आर्थिक नुकसान झाला आहे. हाताला आलेली मूग व उडीद पाणी लागून सडून गेल्याने शेतकरी हतबल झाला आहे. तेव्हा वागदरी जिल्हा परिषद गटात संबंधित महसूल व कृषी खात्याने या परिसरातील पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य तो नुकसान भरपाई व मोबदला द्यावा अशी मागणीचे निवेदन अक्कलकोट येथील तालुका कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसीलदार यांच्याकडे वागदरीचे युवा सरपंच शिवानंद घोळसगाव यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शेतकऱ्यांनी केली आहे. यावेळी वागदरीचे सरपंच शिवानंद घोळसगाव उपसरपंच पंकज सुतार श्रीशैल ठोंबरे मल्लिनाथ ठोंबरे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शानप्पा मंगाने घालया मठपती ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत भैरामडगी बसवराज वरनाळे बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.

- Advertisement -spot_img
spot_img

Related Articles

Latest Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img