हजूर न्यू अँड रिन्यू एबल एनर्जी प्रा. लि. व सिद्धार्थ सोशल फौंडेशनचा उपक्रम
गोगांव येथे गोरगरीब गरजूना १२५ किराणा किट वाटप
अडचणीच्या काळात सिद्धार्थ सोशल फौंडेशनचे कार्य उल्लेखनीय – सरपंच वनिता सुरवसे
अक्कलकोट प्रतिनिधी
अतिवृष्टी व पुरामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले असून,अनेक कुटुंब संकटातून बाहेर येऊ शकलेली नाहीत.अशा बिकट परिस्थितीत हजूर न्यू अँड रिन्यू एबल एनर्जी प्रा.लि.व सिद्धार्थ सोशल फौंडेशन या संस्थेच्यावतीने पूरग्रस्त कुटुंबांना दिवाळी सण गोड व्हावी यासाठी किराणा साहित्याचे १२५ किट वाटप करून मदतीचा हात देण्यात आला.
गोगाव ता.अक्कलकोट येथे हजूर न्यू अँड रिन्यू एबल एनर्जी प्रा.लि.व सिद्धार्थ सोशल फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गरीब व गरजू लोकांना धान्याचे किट वाटपचा कार्यक्रम पार पडला.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच वनिता मधुकर सुरवसे हे होत्या. कंपनीचे प्रतिनिधी नितीन कांबळे,निजपा गायकवाड, भाजपा तालुका उपाध्यक्ष प्रदीप जगताप,परमेश्वर शेळके(पैलवान)धोंडूराज बनसोडे,मारुती सोनकवडे , रमेश मंगाणे, कल्याणराव बिराजदार उपस्थित होते.
गोगाव सरपंच वनिता सुरवसे बोलताना म्हणाल्या की,सामाजिक बांधिलकी म्हणून सिद्धार्थ सोशल फौंडेशन व हजूर न्यू अँड रिन्यू एबल एनर्जी प्रा.लि.या संस्थेतर्फे विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविले जातात.यावर्षी अतिवृष्टी व पुरामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या गोर गरिब कुटूबीयांना आधार व्हावा यासाठी नेहमीप्रमाणे मदत केली आहे.खरोखर त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे.असे
म्हणाल्या.
प्रस्तावना करताना संस्थेचे अध्यक्ष तथा उपसरपंच कमलाकर सोनकांबळे म्हणाले की,जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व धर्मादाय सह आयुक्त यांच्या आदेशाने अक्कलकोटचे आ.सचिन कल्याणशेट्टी यांच्या आवाहनानुसार युवा ने्तृत्व बसवराज शेळके व भाजपा तालुका उपाध्यक्ष प्रदीप जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धार्थ सोशल फौंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने हजूर न्यू अँड रिन्यू एबल एनर्जी प्रा.लि.यांच्या मदतीने गोगांव येथील गोरगरीब गरजू , शेतकरी व मजुरांना १२५ किटचे वाटप केले.
यावेळी बोलताना नितीन कांबळे म्हणाले की,गरीब व गरजूंची दिवाळी गोड व्हावी म्हणून सिद्धार्थ सोशल फौंडेशनचे एक छोटीशी प्रयत्न आहे.हजूर न्यू अँड रिन्यू एबल एनर्जी प्रा.लि. कंपनी यापुढे शेतकऱ्याच्या कुठल्याही अडचणीत आमची कंपनी सहकार्य करण्यास सदैव तत्पर आहे.
यावेळी मनोगत व्यक्त करताना कल्याणराव बिराजदार म्हणाले की, संस्थेचे सामाजिक उपक्रम चांगले असून संस्थेचे अध्यक्ष कमलाकर सोनकांबळे जनहिताचे काम करत असतात असे म्हणाले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शांतकुमार बनसोडे, प्रदीप भा. जगताप, परमेश्वर गायकवाड, सूर्यकांत जिरगे, निगाणा तावरखेड, विजयकुमार गायकवाड, मौला नदाफ,नामदेव बनसोडे, असलम मुल्ला,आकाश गायकवाड, विनोद बनसोडे,संजय गायकवाड जगनाथ सुरवसे सायबाना जमादार आदिनी परिश्रम घेतले.
सूत्रसंचालन नितीन गायकवाड यांनी केले तर आभार सुरेश सोनकांबळे यांनी मानले.