श्री स्वामी समर्थ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे वंदे मातरम सार्थ शताब्दी महोत्सव संपन्न
अक्कलकोट प्रतिनिधी
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अक्कलकोट येथे वंदे मातरम सार्थ शताब्दी महोत्सव फत्तेसिंह मैदान येथे संपन्न झाला प्रथम आलेले सर्व मान्यवरांचे स्वागत संस्थेतील शिल्प निदेशक श्री दिनेश मंठाळे सर यांनी केले सदर महोत्सवच्या कार्यक्रम अध्यक्षस्थानी नायब तहसीलदार श्री दत्तात्रय गायकवाड यांची निवड करण्यात आली त्यास अनुमोदन संस्थेचे जेष्ठ शिल्प निदेशक नदाफ सर यांनी दिले सदर महोत्सवाचे उद्घाटन भारत माता प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन आयएमसी अध्यक्ष श्री राजशेखर हिपरगी,आयएमसी सदस्य कमलाकर सोनकांबळे,यासह मान्यवराच्या हस्ते करण्यात आले सदर महोत्सवाची प्रस्तावना संस्थेचे शिल्पनदेशिका सौ रेणुका गवल मॅडम यांनी केली त्यामध्ये वंदे मातरम हे गीत बंकिमचंद्र चटोपाध्याय यांनी 1875 साली लिहिलेले गीत स्वातंत्र्यलढ्यात तसेच स्वतंत्र्य कालखंडात ही अन्य न साधारण महत्त्व प्राप्त झाले आहे आनंदमठ या कादंबरीतील हे गीत भारत मातेच्या स्तुतीचे प्रतीक असून स्वातंत्र लढ्यातील असंख्य क्रांतिकारक व प्रेरणादायी ठरलेले आहे या गीतास दिनांक 7 नोव्हेंबर 2025 रोजी 150 वर्ष पूर्ण होत आहे या ऐतिहासिक महत्त्वाच्या घटनेच्या निमित्ताने राज्यातील सर्व शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये कौशल्य विद्यापीठ कौशल्य विकास केंद्र इत्यादी मध्ये भारत मातेच्या स्तुतीचा गौरव दिन साजरा करण्यात आला वंदे मातरम गीताचे सामूहिक गायन करण्यात आले त्यानंतर संस्थेतील प्रशिक्षणार्थ्याकडून लघु नाटिका सादर करण्यात आली त्यानंतर अध्यक्षीय भाषणामध्ये नायब तहसीलदार गायकवाड यांनी वंदे मातरम सार्थक शताब्दी महोत्सव बद्दल महत्त्वपूर्ण अशी माहिती दिली. त्यानंतर सदर महोत्सवाचे मुख्य वक्ते श्री अभिजीत लोके सर यांनी बंकिमचंद्र चटोपाध्याय यांनी लिहिलेले वंदे मातरम हे गीत अत्यंत प्रेरणादायी असून त्याचे अवलोकन प्रत्येक नागरिकांनी केले पाहिजे याची प्रचिती सर्व प्रशिक्षणार्थी व उपस्थितांना करून दिली त्यानंतर वंदे मातरम गीताचे समूह गायन करण्यात आले सदर महोत्सव करिता संस्थेचे प्राचार्य श्री मोरे साहेब यांचे अनमोल असे मार्गदर्शन लाभले तसेच संस्थेचे गटनिदेशक श्री गणेश काशीद सर यांचे संयोजनाखाली व मार्गदर्शनाखाली सदर महोत्सव घेण्यात आला व सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संस्थेचे शिल्प निदेशक श्री वाघमारे सर यांनी केले सदर कार्यक्रमाकरिता प्रमुख पाहुणे मान्यवर म्हणून आयएमसी अध्यक्ष श्री राजशेखर हिपरगीसाहेब,आयएमसी सदस्य कमलाकर सोनकांबळे, चनशेटी सर सौ काळे मॅडम सौ साळुंखे मॅडम खेडगी कॉलेजचे श्री हिंदोळे सर अर्जुन सर होटकर सर व संस्थेतील शिल्प निदेशक श्री बगले सर लिंबे सर बोंगाळे सर स्वामी सर कोणापुरे सर बिराजदार सर श्री खंदारे सर श्री सोनंद सर व लोटे मेजर क्षीरसागर मेजर पाटील मेजर अस्वले मेजर यांनी परिश्रम घेतले आदींनी परिश्रम घेतले घेतले








