बसवराज शेळके सावकार वागदरी जिल्हा परिषद गटातील उदयोन्मुख नेतृत्व…
वागदरी परिसरात आज ज्या नव्या नेतृत्वाची ठाम,स्पष्ट आणि जमीनीवरची छाप पडत आहे,त्या नावांमध्ये बसवराज शेळके सावकार हे अत्यंत प्रभावी नाव ठामपणे पुढे येत आहे. सामाजिक क्षेत्रातील योगदान,शैक्षणिक परंपरेचा वारसा आणि राजकीय क्षेत्रातील सातत्यपूर्ण कर्तृत्व यांच्या जोरावर बसवराज शेळके सावकार हे वागदरी व पंचक्रोशीत उदयास आलेले एक प्रभावी,लोकाभिमुख आणि कामदार नेतृत्व म्हणून सर्वदूर चर्चेत आहेत.ते काही दिवसात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीस भारतीय जनता पक्षा कडून इच्छुक आहेत असे वागदरी जिल्हा परिषद गटातून जोरदार चर्चा गावघड्यातील कट्ट्यावर चालू आहे .कारण ज्या काळात वागदरी भागात एक सक्षम नेतृत्व सचिन दादा जवळ नव्हता तेव्हा हा चेहरा दादानी योग्य पारखून काढला तेव्हा पासून ते दादाच्या प्रत्येक काम एक निष्ठेने करत आलेले आहेत.
शिक्षण क्षेत्रातील “एस.एस. शेळके प्रशाला” व ज्युनियर कॉलेज चा गौरवशाली वारसा त्यांच्या सोबत…
पूर्वीच्या काळी घोळसगाव,शिरवळ,शिरवळवाडी,गोगाव, खैराट,बोरगाव,किरनली या गावातील विद्यार्थ्यांना सातवी नंतर पुढील शिक्षणासाठी जवळपास एकमेव आशास्थान होती वागदरी येथील एस.एस. शेळके प्रशाला.शेळके कुटुंबाने मोठ्या समर्पणातून या संस्थेचा कारभार सांभाळला आणि हजारो विद्यार्थी घडवण्याचे अप्रतिम कार्य अनेक दशकांपासून अविरत सुरू ठेवले…
आज या संस्थेचे विद्यमान अध्यक्ष म्हणून बसवराज शेळके सावकार अत्यंत जबाबदारी,प्रामाणिकपणा आणि दूरदृष्टीने कारभार सांभाळत आहेत.शैक्षणिक पायाभूत सुविधा उभारणे,विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवणे,ग्रामीण मुलांना प्रगतीचे नवे मार्ग दाखवणे यामुळे त्यांचे कार्य समाजात अत्यंत मानाचे मानले जाते…
राजकारणातील प्रवास…
तरुणपणापासून सामाजिक भान,जनतेच्या अडचणी समजून घेण्याची वृत्ती आणि लोकसंग्रह यामुळे ते कमी वेळातच राजकीय वर्तुळात ओळख निर्माण करण्यात यशस्वी झाले.काळाच्या ओघात त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या विचारांना स्वीकारले आणि विकासाभिमुख,परिणामकारक राजकारण करण्याचा निर्धार केला. त्यांच्या घराण्यात आजी रत्नाबाई शेळके हे भाजपा कडून सन 1991 ते 1995 दरम्यान जिल्हा परिषद सदस्य झाले होते मुळात भाजपा घरांना असलेले शेळके परिवार काही काल राजकारणापासून अलिप्त होते मात्र सचिन दादाने त्यांना राजकारणात पुन्हा सक्रिय होण्यास सांगितल्यावर आज भाजपात ते सक्रिय असून वागदरी भागात पक्ष संघटन मजबूत करणे,नवीन कार्यकर्ते घडवणे,स्थानिक प्रश्न सोडवणे आणि समाजाशी नातं घट्ट ठेवणे यासाठी ते सतत कार्यरत आहेत…पक्ष ज्यांना संधी देतील त्यांचा आम्ही काम करू हे नेहमी बोलत असतात,साधा,सरळ,सज्जन माणसा पैकी एक व्यक्ती आहेत.
त्यांची संयमी नेतृत्वशैली,लोकांशी सहज संवाद,सर्व समाजांना समान वागणूक आणि कार्यकर्त्यांना सतत साथ देण्याची तयारी यामुळे त्यांच्याविषयी एक विश्वास निर्माण झाला आहे…
बसवराज शेळके सावकार हे फक्त राजकीय व्यक्तिमत्त्व नाहीत,तर वागदरी भागात जनतेचा आधारस्तंभ म्हणून त्यांना विशेष मान मिळतो.पंचक्रोशीतील प्रत्येक गावात त्यांच्या कुटुंबाचा शिक्षण आणि समाजसेवेचा वारसा तर आहेच, पण बसवराज शेळके सावकार यांनी स्वतःच्या कामानेही लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे.सर्वसामान्यांच्या अडचणींना तातडीने प्रतिसाद,पक्ष संघटनात नवे उत्साह आणणे,तरुणांना पुढे आणण्याचा प्रयत्न,सामाजिक समतोल राखत लोकांमध्ये एकोपा निर्माण करणे या सर्व कार्यपध्दतीमुळे ते वागदरी व आसपासच्या भागातील एक प्रभावी,विश्वासार्ह आणि दूरदृष्टी असलेले लोकप्रिय नेतृत्व ठरत आहेत…
भविष्यातील राजकीय भूमिका दृढ,सक्षम आणि उभारी देणारी…
आजच्या राजकारणात लोकांना वागणारा,बोलणारा,जमिनीवर उतरणारा आणि विकासाला प्राधान्य देणारा नेता हवा असतो.
बसवराज शेळके सावकार यांच्यात हे सर्व गुण आहेत. म्हणूनच आज संपूर्ण वागदरी भाग त्यांच्या नावाकडे आशेने पाहू लागला आहे.भाजपाच्या माध्यमातून ते पुढील काळात आणखी प्रभावी नेतृत्व म्हणून उदयास येतील,अशी सर्वसामान्यांमध्ये ठाम धारणा आहे.त्यांच्या नेतृत्वामुळे वागदरी परिसरात विकासाच्या नवनव्या संधी निर्माण होत आहेत आणि त्यातून एक नवी दिशा तयार होत आहे.बसवराज शेळके सावकार हे शिक्षण,समाजसेवा आणि राजकारण या तीनही क्षेत्रांमध्ये समतोल राखत पुढे जाणारे नेतृत्व आहे.त्यांच्या कुटुंबाचा शैक्षणिक वारसा,त्यांचे स्वतःचे समाजकार्य आणि सध्याची भाजपातील सक्रिय भूमिका यामुळे ते वागदरीचा उदयोन्मुख,प्रभावी नेता म्हणून अढळपणे पुढे येत आहेत.
वागदरी भागातील विकासाची नवी पहाट त्यांच्या नेतृत्वामुळे उजाडत आहे त्याच्यामागे युवकांचे मोठी फळी त्यांनी जिल्हा परिषद गटात निर्माण केले आहेत
आणि येणाऱ्या काळात हे नाव आणखी बुलंद होणार,यात कोणतीही शंका नाही…
✍🏾सतीश कल्याणी पालापुरे
अक्कलकोट








