वागदरी जिल्हा परिषद मतदार संघात ‘टिफिन बैठक’ संपन्न
अक्कलकोट ( प्रतिनीधी )
पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारच्या यशस्वी ९ वर्षे पूर्तिनिमित्त मोदी @9 अभियान राबविण्यात येत आहे. याअंतर्गत अक्कलकोट मतदारसंघातील वागदरी जिल्हा परिषद गटात माजी संघटनमंत्री श्री रघुनाथ कुलकर्णी व जिल्हा अध्यक्ष श्री सचिन दादा कल्याणशेट्टी यांच्या उपस्थितीत ‘टिफिन बैठक’ संपन्न झाली
या प्रसंगी मोदी सरकारच्या काळातील विविध विकासकामे,जनकल्याणच्या योजना आणि देश संरक्षणासाठी सरकारने घेतलेली भूमिका जनतेपर्यंत पोचवावे असे आवाहन यावेळी श्री रघुनाथ कुलकर्णी यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना केले.
यावेळी बोलताना आमदार सचिन कल्याणशेट्टी म्हणाले की गेल्या नऊ वर्षात देशाच्या विकाससाठी प्रधानमंत्री काम करत असून त्यांनी राबविलेले विविध योजना प्रत्येक घरामध्ये पोचविण्याचे काम सर्व कार्यकर्त्यांचे आहे, अक्कलकोट विधानसभा मतदार संघातील विकास कामासाठी मी सदैव कटिबद्ध आहे कोरोणा काळात राज्य सरकार विरोधकांचे असताना देखील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कडे अनेक रस्त्याचे पाठपुरावा करून रस्ते मंजूर करू घेतले आहे त्यामुळे येत्या काळात तालुक्यातील सर्व रस्ते खड्डा मुक्त होतील वागदरी भुरिकवठे रस्ता आज चांगल्या प्रकारे झाले आहे त्या सोबत वागदरी भागातील शेतकऱ्याचे वीज समस्या मोठी होती ते ही आज मिटलेले आहे राज्य शासन व केंद्र शासन यांचे विविध योजना सर्व सामान्य पर्यंत पोचवून त्यांना लाभ मिळण्यासाठी प्रयत्न करावे
यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी व मिलन कल्याणशेट्टी यांनी वागदरी जिल्हा परिषद मतदार संघातील कार्यकर्ते, सरपंच, उपसरपंच आणि पदाधिकारी यांच्याशी संवाद साधून विविध कामाचे ,समस्याचे चर्चा केले
यावेळी श्री मोतीराम राठोड, श्री मिलन दादा कल्याणशेट्टी, श्री बसवराज शेळके, अक्कलकोट विधानसभा प्रमुख श्री राजकुमार झिंगाडे, श्री आप्पासाहेब बिराजदार, श्री महेश हिंडोळे,श्री श्रीशैल काका ठोंबरे,
श्री मल्लिनाथ शेळके सावकार,श्री प्रदीप जगताप,श्री कमलाकर सोनकांबळे,
सौ सुरेखाताई होळकट्टी,सौ विद्याताई स्वामी,श्री सिद्धाराम मठपती,श्री शाणाप्पा मंगाणे,श्री बसवराज शेळके, श्री प्रदीप पाटील,श्री घाळय्या मठपती,श्री श्रीमंत कुंटोजी, श्री शंकर उणदे ,श्री मल्लिनाथ उणदे,श्री सतीश कणमुसे,श्री राजू किवडे,श्री शशिकांत पाटील,श्री हणमंत घोदे,श्री सुनील सावंत, श्री प्रकाश पोमाजी,श्री संतोष पोमाजी,श्री राजकुमार हुग्गे, श्री बसवराज पाटील, लक्ष्मीबाई पोमाजी,श्री लक्ष्मण सोनकवडे, जयश्री बटगेरी,शारदाताई रौट्टे, कावेरी नंजूडे,श्रीकांत इंडे, शाम बाबर सचिन घुगरे, धोडपा मुलगे व भारतीय जनता पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादेव सोनकवडे यांनी केले.