दौंड येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलचे ऍथलेटिक स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी
पुणे ( प्रतिनीधी )
पोदार इंटरनॅशनल स्कूल दौंडच्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय ऍथलेटिक स्पर्धेत भाग घेतला आणि त्यात उत्कृष्ट कामगिरी करून शाळेचा नावलौकिक मिळवला.
14 वर्षांखालील मुले – 400 मीटर मुलांच्या शर्यतीत इयत्ता 8 मधील सम्यक सोनकांबळे याने द्वितीय क्रमांक मिळविला आणि तो जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.
14 वर्षांखालील मुलांच्या 100 मीटर हर्डल्समध्ये पृथ्वीराज शितोळे याने चौथा क्रमांक पटकावला.
14 वर्षांखालील मुलींच्या 80 मीटर हर्डल्समध्ये कृष्णाली सातव हिने 2रा क्रमांक पटकावला आणि जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरली असून सान्वी जगताप हिने चौथा क्रमांक पटकावला आहे.
100 मीटर अडथळा मध्ये श्रावणी जगदाळे हिने तिसरा क्रमांक पटकावला आहे. कादंबरी शिंदे हिने तालुकास्तरीय ऍथलेटिक स्पर्धेत चौथा क्रमांक पटकावला आहे.
प्राचार्य व क्रीडा प्रभारींसह सर्व विजेत्यांचे अभिनंदन पालक वर्गातून करण्यात येत आहे