4.1 C
New York
Monday, January 13, 2025

Buy now

spot_img
spot_img

मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी वागदरी येथे एक दिवशी लाक्षणिक उपोषण

मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी वागदरी येथे एक दिवशी लाक्षणिक उपोषण

अक्कलकोट ( प्रतिनीधी ) मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी वागदरी भागातील सकल मराठा समाज वागदरी व सर्व राजकीय पक्ष व विविध सामाजिक संघटनेच्या वतीने व युवकाच्या माध्यमातून मराठा समाजाचे नेते भाजपा तालुका उपाध्यक्ष प्रदीप जगताप, यांच्या नेतृत्वाखाली एक दिवशी लाक्षणिक उपोषण करण्यात आले यावेळी शेळके प्रशालेचे चेअरमन बसवराज शेळके, जेष्ठ नेते श्रीशैल ठोंबरे, युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष शिवराज ( मंत्री ) पोमाजी, उपसरपंच कमलाकर सोनकांबळे, शिवसेना ( उबाठा ) विभागप्रमुख मुगेद्र मुदिनकेरी, वागदरीचे तंटामुक्त अध्यक्ष शरणप्पा मंगाणे, शिवाजी सावंत, महादेव सोनकवडे, सागर दादा कल्याणशेट्टी युवा मंच तालुकाध्यक्ष श्याम बाबर, संतोष पोमाजी, सुनील सावंत, घालया मठपती, मनसेचे राज यादव, प्रकाश पोमाजी, मकबूल कणमुसे, राम मोरे ,विशाल सावंत , सौरभ उंबरे, समर्थ सावंत, गणेश सावंत, चंद्रकांत कणसे,दिगंबर कणसे, लक्ष्मण पवार, चंद्रकांत मातोळे, तानाजी इंगळे, राहुल शिंदे, काशिनाथ पोमाजी, राम सगट, परमेश्वर खासगी पिंटू पोमाजी, सागर पोमाजी यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते,
यावेळी बोलताना कमलाकर सोनकांबळे म्हणाले की मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी या ठिकाणी आपण सर्वांनी शांततेत आंदोलन करायचे आहे मनोज जरंगे पाटील यांनी गेल्या अनेक वर्षापासून लढत असलेले मराठा समाजाच्या आरक्षणासाठी चालू असलेल्या आंदोलनास आपण कुठल्याही प्रकारचे गालबोट न लावता शांततेत उपोषण करणे गरजेचे आहे कायदा सुव्यवस्था न बिघडता आपण आपल्या पद्धतीने शांततेत मोर्चा काढून आपले मागणी शासन दरबारी मांडण्यासाठी प्रयत्न करूया आमच्या गोगांव ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने मराठा आरक्षण साठी जाहीर पाठिंबा देण्यात येत आहे
शिवसेना ( उबाठा ) विभागप्रमुख मुगेद्र मुदिनकेरी यांनी ही मनोगत व्यक्त करून पाठींबा जाहीर केले, संघर्ष सामाजिक संस्थेचे वतीने मराठा आरक्षणास पाठिंबा असल्याचे जाहीर करण्यात आले,
मराठा आरक्षण मिळण्यासाठी एक दिवशी लाक्षणिक उपोषण शिव बसव चौक वागदरी येथे शांततेत करण्यात आले यावेळी वागदरीचे गाव कामगार तलाठी कोळी यांना निवेदन देऊन वागदरी बाजारपेठ दोन तास बंद ठेवून शांततेत आंदोलन करण्यात आले,
सकल मराठा समाज वागदरी व सर्व राजकीय पक्षी व विविध सामाजिक संघटनेच्या वतीने
वतीने एक दिवशीय उपोषण करण्यात आला यावेळी सर्व गावातील समाज बांधव, सर्व राजकीय पक्ष तसेच सर्व व्यापारी आपले दुकाने बंद करून मराठा समाजाला पाठिंबा देऊन सहकार्य केले

- Advertisement -spot_img
spot_img

Related Articles

Latest Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img