नागणसुर कन्नड मुली-मुले शाळेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त बालिका दिन उत्साहात
अक्कलकोट :- ( प्रतिनीधी )
तालुक्यातील नागणसुर येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड मुली-मुले शाळेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त किशोरी हितगुज मेळावा बालिका दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आले .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेतील जेष्ठ शिक्षक कल्लय्या गणाचारी होते.संपूर्ण किशोरी हितगुज मेळाव्याचे अध्यक्ष स्थानी शाळेतील गुणवंत विद्यार्थिनी प्रकृती मठपती तर उपाध्यक्षस्थानी साक्षी रेवी होते.प्रारंभी सावित्रीबाई फुले वेशभूषेत व्यासपीठावर उपस्थित विद्यार्थिनींच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले प्रतिमा पूजन करण्यात आले.या वेळी शाळेतील विद्यार्थिनी गंगोत्री मठपती हिने सावित्रीबाई फुले यांच्या जीवनधारा गीत स्वरूपात म्हणून आदरांजली वाहिली.शाळेतील विद्यार्थिनी दिपाली बिराजदार ,गंगोत्री मठपती आणि प्रकृती मठपती यांनी मनोगत व्यक्त केले.शिक्षिका चन्नम्मा बिराजदार ,राजशेखर खानापुरे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाविषयी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.व्यासपीठावर शाळेतील विद्यार्थिनी संस्कृती मठपती,श्रद्धा कोनापूरे,सृष्ठी पुजारी,स्नेहा कोळी,लक्ष्मी हिप्परगी,साक्षी पुजारी,गंगोत्री मठपती आदी विद्यार्थिनी सावित्रीबाई फुले वेशभूषेत उपस्थित होते.विद्यार्थिनींना मनोरंजनात्मक खेळ,गाणे,गोष्ठी,एकपात्री अभिनय,गितगायन,धावणे,चित्रकला आदी स्पर्धा घेवून पारितोषिक वितरण करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कल्लय्या गणाचारी,राजशेखर कुरले,शरणप्पा फुलारी,लक्ष्मीकांत तळवार,राजशेखर खानापुरे,विजयश्री एंटमन,चन्नम्मा बिराजदार,शिवशरण म्हेत्रे आदींनी परिश्रम घेतले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सारिका बिराजदार यांनी केले तर आभार दिपाली बिराजदार मानले.