केंद्र सरकारच्या हिट अँड रन
कायद्याविरोधात निषेध आंदोलन
चालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी
घेतली म्हेत्रे यांची भेट
अक्कलकोट ( प्रतिनिधी ) : केंद्र सरकारच्या हिट
अँड रन कायद्याविरोधात अक्कलकोटमधील जीप,ट्रक, रिक्षा टेम्पो चालक एकत्र आले असून उद्या (शुक्रवारी) सकाळी १० वाजता अक्कलकोट बस स्टँडवर या कायद्याविरोधात निषेध आंदोलन करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला.हा कायदा अतिशय अन्यायकारक असून यामध्ये चालक आर्थिक दृष्ट्या देखील भरडला जाण्याची शक्यता आहे त्यामुळे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांची तालुक्यातील सर्व चालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली आणि आपल्या व्यथा मांडल्या.यानंतर म्हेत्रे यांनी माझी
भूमिका सर्वचालकांसोबत राहण्याची
असून उद्या आपण सर्वजण मिळून या कायद्याच्या विरोधात निषेध आंदोलन
करूया,अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
केंद्र सरकारने आतापर्यंत जे जे कायदे
आणले ते हुकूमशाही पद्धतीने आणले आणि लोकांवर लादण्याचा प्रयत्न केला कधीही लोकांचे म्हणणे ऐकून घेतले नाही.हिट अँड रन कायदा देखील अशाच पद्धतीचा आहे यामुळे चालकांचे जीवन उध्वस्त होणार आहे सर्व चालकांनी मिळून जर या कायद्याविरोधात एकत्र येऊन या जुलमी सरकार विरोधात एकमुखांनी निर्णय घेतला तर हे सरकार
खाली यायला सुद्धा वेळ लागणार नाही,असे
ते म्हणाले.यावेळी बोलताना काँग्रेसचे ज्येष्ठ
नेते अश्पाक बळोरगी म्हणाले,तालुक्यात ट्रक चालकांचा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे जर अशा प्रकारची एखादी अपवादात्मक जरी घटना घडली तरी त्या चालकाचे जीवन पूर्णपणे उध्वस्त होऊन त्यांचे कुटुंब उघड्यावर येणार आहे.अपघात होऊ नये याची खबरदारी सर्व चालक घेतातच पण अशा पद्धतीचा कायदा आणून सरकारला काय साध्य करायचे आहे हे कळायला तयार नाही हे सरकार सामान्य लोकांसाठी आहे की मनमानी कारभार करण्यासाठी आहे,असा सवाल त्यांनी उपस्थित केला.काँग्रेस नेते मल्लिकार्जुन पाटील यांनी केंद्र सरकारच्या धोरणावर टीका करत हा निर्णय सरकारने त्वरित मागे घ्यावा, अशी मागणी केली. या बैठकीमध्ये काही संघटनाने संप मागे घेतलेला आहे याचा अर्थ कायदा मागे घेतलेला नाही दिशाभूल करून हे सर्व झालेले आहे त्यामुळे आमचा या कायद्याला विरोध कायम आहे अशी भूमिका टेम्पो, रिक्षा, जीप ,ट्रक चालकांनी मांडत या कायद्यामुळे नुकसान कसे होणार आहे याची इत्यंभूत माहिती सर्वांना दिली.या आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि
काँग्रेस हे तिन्ही पक्ष व त्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार असल्याची
माहिती माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी दिली.
यावेळी तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील, माजी उपसभापती सिद्धार्थ गायकवाड ,विठ्ठल चव्हाण, सुरेश रणझुंजारे, महिबूब ताशेवाले, सचिन साखरे, बशीर
सय्यद, लक्ष्मण धायगुडे शिवानंद बिराजदार, युसुफअली खोजे आदींसह तालुक्यातील
ट्रक, टेम्पो, रिक्षा, जीपचे चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.