पोलिसांच्या दहशतीमुळे अक्कलकोटच्या भीम नगरमधील नागरिकात पसरली भिती , महिला व लहान मुलांमधून पोलिसांच्या कृतीबद्धल तीव्र नाराजी
विनाकारण समाजाला वेठीस धरल्यास पोलीस प्राधिकरण व अनुसूचित जाती जमाती व मानवी हक्क आयोगाकडे न्याय मागणार
अक्कलकोट l प्रतिनिधी
पोलिसांच्या दहशतीमुळे अक्कलकोटच्या भीम नगरमधील नागरिकात मोठी भिती पसरली असुन नागरीक लहान मुले व महिला प्रचंड घाबरले आहेत, आणि नागरिकांमध्ये पोलिसांची मोठी दहशत पसरली आहे. महिला व लहान मुलांमधून पोलिसांच्या कृतीबद्धल तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे
अक्कलकोट शहरात दोन युवकांच्या गटात झालेल्या हाणामारी प्रकरणी उत्तर पोलिसांकडून बळाचा वापर सुरू असून भीमनगरला टार्गेट करून वेठीस धरण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात सूरु झाला आहे, यामुळें भीमनगर मधील नागरिकांसह महिला वर्गातून पोलिसांच्या दहशतीमुळे व दडपशाही मुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. हाणामारीतील आरोपी हे फरार असून त्यांना शोधण्याची जबाबदारी ही पोलीस प्रशासनाची असून या प्रकरणात ज्यांचा सहभाग नाही अशा निष्पाप नागरिकांना नाहक त्रास दिला जात आहे, यामुळें अक्कलकोट तालुक्यातील आंबेडकरी समाजामध्ये व सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे.
अक्कलकोट शहरात दिनांक सहा जानेवारी शनिवारी रोजी रात्रीच्या सुमारास बेडर कन्नय्या चौकात दोन गटात हाणामारी झाली होती. या प्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादीवरून 18 जणाविरोधात अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यातील काही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पण यातील काही आरोपी हे गुन्हा घडल्यापासून फरार आहेत. या फरार आरोपींना शोधण्याचे काम पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांकडून बळाचा वापर करून अख्या भीमनगरलाच वेठीस धरण्याचा प्रकार सुरू असून दडपशाही सूरु करण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसापासून रात्रीच्या सुमारास पोलीस प्रशासनाकडून भीमनगर मध्ये घरात घुसून तपासणी करण्याचे काम करण्यात येत आहे. पोलिसांच्या या कृतीचा याप्रकरणी तीळ मात्र ही संबंध नसणाऱ्या नागरिकांनी त्रास देत आहेत यांची निषेध केला जात आहे.
पोलिसांनी आरोपींना अवश्य शोधावे पण सर्व भीम नगरलाच वेठीस धरू नये अशी प्रतिक्रिया या ठिकाणच्या नागरिकांसह महिला वर्गातून उमटत आहे .वारंवार पोलिसांकडून भीमनगर मध्ये रात्री अपरात्री घुसण्याचा प्रयत्न केला जात आहे. याचा निषेध करण्यासाठी पूर्ण भिमनगर मधील आबाल वृद्ध हे कडाक्याच्या थंडीत गुरुवारी मध्यरात्री पोलीस ठाण्यासमोर बसून होते. यावेळी एल सी बी चे मुख्य पोलीस उपअधीक्षक येऊन यापुढे विनाकारण कुणाला त्रास होणार नाही असे सांगितल्यावर वातावरण शांत झाले, यावेळी सर्वच पक्षाच्या नेत्यांनी पोलिसांच्या दडपशाहीचा निषेध केला. पोलीस प्रशासनाने आरोपींचा शोध घ्यावा पण भीम नगरला वेठीस धरू नये अशा भावना अनेक नेत्यांनी व नागरिकांसह महिला वर्गाने व्यक्त केले आहेत.
पोलिस प्रशासन एकतर्फी करवाई करत असून समांतर गुन्हे दाखल करण्यात आले असतानाही दुसऱ्या बाजूच्या आरोपींना मात्र मोकळे सोडण्यात आल्या बद्धल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पोलीस स्टेशन समोर रात्री झालेल्या फेसबुक लाईव्ह, कोण काय म्हणाले
१) निष्पाप लोकांना त्रास देऊ नका फिर्यादीने शुद्धीवर फिर्याद दाखल केले असताना त्यांच्या फिर्यादीमध्ये नमूद तेरा लोकांचे नाव असताना विनाकारण भीम नगर समाजातील लोकांना नाहक त्रास देऊ नका जर राजकीय दबाव असेल तर त्यांचं नाव सांगा त्यांच्या घरासमोर आम्ही बसू
उत्तम गायकवाड, माजी नगरसेवक अक्कलकोट
2) पोलिसांना आम्ही कायमचे सहकार्य करत असतो आमच्या भीमनगर समाजामध्ये रात्र अपरात्र पोलीस येत असल्याने घाबरून लहान मोठे वयोवृद्ध लोक शेतामध्ये एकडे तिकडे जाऊन झोपत आहेत गेल्या तीन-चार दिवसापासून आमच्या समाजात चूल पेटलं नाही
अविनाश मडीखांबे, तालुकाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट
3) भीम नगर मध्ये येऊन लोकांना विनाकारण पोलिसांनी घरात घुसून त्रास देऊ नका समाजाला विनाकारण वेटीस धरू नये पोलीस प्रशासनाच्या म्हणण्याप्रमाणे इतर मध्ये आम्ही कुठल्याही महिला पुरुषांवर कार्यवाही करतो असे म्हणल्याने आम्ही संपूर्ण भीमनगर समाज रात्री तीन चारच्या दरम्यान पोलीस स्टेशनला संपूर्ण समाजाला अटक करा यासाठी आलो होतो
चंद्रशेखर मडीखांबे, तालुकाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी
4) पोलिसांनी घरात घुसल्याने पोलिसांना घाबरून माझी मावशी चक्कर येऊन पडली त्याच्या जीवाचे बरे वाईट झाल्यास जबाबदार कोण ?
संदीप मंडीखांबे, अध्यक्ष
शिव बसव आंबेडकर सामाजिक संस्था
चौकट
पोलिसांनी योग्य तपास करून कार्यवाही करण्यात यावे खोटी व चुकीच्या माहिती आधारे नावे घेतले असतील तर त्वरित काढण्यात यावे विनाकारण भीमनगर समाजाला टार्गेट करू नये अन्यथा पोलीस प्राधिकरण, मानवी हक्क आयोग, अनुसूचित जाती जमाती आयोग दिल्ली व मुंबई यांच्याकडे तक्रार करण्यात येईल
प्रा. राहुल रुही, रीपाई नेता सोलापूर