‘एस कें’ गायकवाड ची सामाजिक बांधिलकी महत्वाची
————————————————–
तुळजापूर तालुक्यातील आंबेडकर चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते, बौद्धाचार्य व पत्रकार एस. के. गायकवाड (वागदरी)यांचा वाढदिवस. नुकतेच ९ जून रोजी नळदुर्ग येथे रेवाप्पा सोनकांबळे यांच्या स्मृती दिनानिमित्त दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना सत्कार कार्यक्रम व अंबेजोगाई येथील प्राध्यापक गौतम गायकवाड यांना ‘उत्कृष्ट लेखक पुरस्कार’ संपन्न झाला. या कार्यक्रमात ते आयोजक म्हणून सहभागी होते. तुळजापूर तालुक्यातील प्रत्येक आंबेडकरी विचाराच्या कार्यक्रमात ते पुढे असतात. एस के नी अनेक सार्वजनिक कार्यक्रम आयोजित केले. आंबेडकरी विचाराचा आनंद व संपादन करत राहतात. महापुरुषांचे विचार माणसाला सशक्त करतात. ग्रंथातील ज्ञान आणि माणूस स्वतःचा मित्र बनतो. ग्रंथवाचन बाबासाहेब करत. ते ज्ञाने झाले. केवळ ग्रंथामुळे. ग्रामीण भागातील माणूस देखील बाबासाहेबांच्या मार्गावर जावा ही मनोमन इच्छा बाळगून असतात. तेव्हा बाबासाहेबांनी माणसांनी व्यासंग केला पाहिजे. व्यासंगामुळे विषयाची गोडी वाढते. भाषा प्रभुत्व व आत्मविश्वास निर्माण होतो. अहंकार व उद्धटपणा निघून जातो. साधेपणा निर्माण होतो. तेव्हा एस के वर आंबेडकरांच्या विचारांचा प्रभाव व परिणाम झालेला दिसून येतो. त्यांना नोकरी करता आली नाही. परंतु सामाजिक कार्याला एस के नी पूर्णपणे वाहून घेतले. हे सत्य आहे.
स्वभावाने ‘एस के’ गायकवाड हे अतिशय नम्र, साधे व सतत आंबेडकर चळवळीत व्यस्त असणारे सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार म्हणून तुळजापूर तालुका / उस्मानाबाद जिल्ह्यात प्रसिद्ध आहेत. त्यांच्या सामाजिक, धार्मिक आणि राजकीय क्षेत्रातील कामगिरी उल्लेखनीय कामगिरी बद्दल, गेल्या वर्षी आष्टाकासार येथील समीक्षा फाउंडेशनच्यावतीने त्यांना ‘समीक्षा जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. ते पूर्ण वेळ बौद्धाचारी म्हणून देखील काम करत असतात तुळजापूर, उमरगा व लोहारा या तालुक्यातील बौद्ध विवाह संस्कारविधी करण्यासाठी त्यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. प्रत्येक मंगल परिणय प्रसंगी एस के गायकवाड. अगदी नाममात्र प्रवास खर्च घेऊन ते लग्न लावतात. त्यांना तसा कोणताही व्यवसाय नाही. परंतु निस्वार्थी पणाने धार्मिक क्षेत्रात, धम्म चळवळ गतिमान व्हावी याकरिता ते कार्यरत असतात. गावा गावातील धम्म चळवळ पिंजून काढून त्यांना धम्म शिकवणे बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या धम्माची जाणीव निर्माण करून देणे व बाबासाहेबांच्या तत्त्वज्ञानाचा प्रचार प्रसार करणे ही कामे प्रामुख्याने आतापर्यंत करत आले आहेत. तसेच आपल्या परिसरातील मागासवर्गीय व वंचित समाजावरील झालेल्या अन्यायाला आपल्या लेखणीतून वाचा फोडण्याचं काम ते करत असतात
भगवान गौतम बुद्ध, शाहू, फुले आणि आंबेडकर आदर्श म्हणून ते नेहमी त्यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी ते उत्सुक असतात. समाजहित हाच त्यांच्या कार्याचा मध्यवर्ती केंद्रबिंदू आहे.
एस के गायकवाड हे आतापर्यंत त्यांच्या जीवनात समाज, भाषा, संस्कृती, चालीरीती श्रद्धा, अंधश्रद्धा व जीवनपद्धती असे माणसाला अंतर्मुख करणारे अनेक विषय त्यांनी हाताळले आहेत. तरी त्यांच्याकडून यावर व्यापक स्वरूपात लेखन व्हावे. अशी अपेक्षा आहे.
बाबासाहेब आंबेडकरांच्या लक्षणीय घोषणा म्हणजे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा त्याचप्रमाणे शिक्षण प्रशिक्षण आणि प्रबोधन हे समाजाला आवश्यक आहे. हे प्रत्येक ग्रामीण भागातील घराघरातून व अनेक कार्यक्रमातून ते सतत प्रकट करत असतात. आपले अभिव्यक्ती स्वातंत्र्य एक ठराविक साच्यात बंद न करता त्यांनी प्रामाणिकपणे समाज हितासाठी व देश हितासाठी आपली लेखणी चालवावी व एक मुक्त चिंतन वैचारिक ग्रंथ त्यांच्याकडून यावा अशी अपेक्षा आहे.
त्यांच्या पत्रकारितेत माणूस हाच त्यांचा केंद्रबिंदू राहिला आहे माणूसच खऱ्या अर्थाने त्याच्या वास्तव जीवनाचा पुरस्कार आहे जगात शांतता नांदावी यासाठी प्रयत्नशील असणारी सम्यक दृष्टी सम्यक प्रज्ञा जगा आणि इतरांना जगू द्या या विचारांचा पुरस्कार ते नेहमी करत असतात सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी अन्यायाचा प्रतिकार करताना दिसून येतात.
सध्या पत्रकार साहित्यिक विचारवंत यांनी बुद्ध फुले आंबेडकर विचार वैश्विक आहेत हे पुन्हा पुन्हा सांगायला हवं. हे विचार सर्वसमावेशक आहेत व शिक आहेत हे साहित्यातून दाखवून द्यायला हवे. यासाठी लेखन करणे अतिशय महत्त्वाचे आहे.
यासाठी लिहीतं राहावं असं मला वाटतं. मानसिक बळ प्रोत्साहन आणि साहित्य हे अन्न वस्त्र निवारा इतकीच जगण्यासाठीची नैसर्गिक गरज आहे याची जाणीव ही आपल्या अनुभवातून लेखनातून व साहित्यातून देण्याची गरज आहे. प्रत्येक अडचणीवर दुःखावर अखेर लेखनच औषध म्हणून काम करत…. असे माझे मत आहे.
एस के गायकवाड यांना पुनश्च शुभेच्छा…!
——————————————————
डॉ . दत्तात्रय गायकवाड;
माजी ग्रंथालय व माहिती अधिकारी;
केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्र;
खडकवासला; पुणे-४११०२४
मो. ९८६०५९१३०५