यादव गायकवाड जागतिक मानवता आयोगाद्वारे देण्यात येणाऱ्या शिक्षक रत्न 2024 ह्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित
नाशिक येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय आणि जागतिक मानवता आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदे चे आयोजन लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालय पंचवटी,नाशिक येथे करण्यात आले होते.
एक दिवसीय आंतर राष्ट्रीय परिषदेत ‘ नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 समस्या,आव्हाने व संधी या विषयावर चर्चा सत्र आयोजित करण्यात आले होते. या आंतर राष्ट्रीय परिषदेत शैक्षणिक क्षेत्रात दिलेल्या अतिशय महत्वाच्या योगदानाबद्दल जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पांगरा शिंदे ता.वसमत जिल्हा हिंगोली येथील प्राथमिक शिक्षक श्री यादव कामाजी गायकवाड यांना जागतिक मानवता आयोगाद्वारा देण्यात येणारा ‘शिक्षक रत्न 2024 हा ‘ राष्ट्रीय पुरस्कार प्रा.डॉ.सुधीर गव्हाणे माजी कुलगुरू य.च.म.मुक्त विद्यापीठ नाशिक, इंजी.महेश डाबक सदस्य नीती आयोग भारत सरकार, जागतिक मानवता आयोगाचे सदस्य, संस्थेचे अध्यक्ष व प्राचार्य यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षक असणाऱ्या यादव गायकवाड यांनी सहा विषयात पदव्युत्तर पदवी केली आहे ,सेट नेट सारख्या नऊ परीक्षा उत्तीर्ण केल्यात आहेत, आनेक संशोधन पेपर प्रकाशित केले आहेत ,स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात इतिहास विषयात सध्या phd करत आहेत त्यामुळे यांना अतिशय मानाचा समजला जाणारा ‘ जागतिक मानवता आयोगाद्वारा देण्यात येणारा शिक्षक रत्न 2024 हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.