1.5 C
New York
Thursday, February 6, 2025

Buy now

spot_img
spot_img

पुणे रहिवासी संघ आयोजित स्नेह मेळावा मोठ्या प्रमाणात संपन्न झाला

पुणे रहिवासी संघ आयोजित स्नेह मेळावा मोठ्या प्रमाणात संपन्न झाला

पुणे :  प्रतिनीधी 
250 अक्कलकोट विधानसभा वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री संतोष कुमार खंडू इंगळे यांच्या प्रचारात अक्कलकोट तालुक्यातील जी पुणे येथे स्थायिक झालेले आहेत त्या पुणे रहिवासी संघतर्फे आयोजित करण्यात आलेला स्नेह मेळावा अतिशय मोठ्या प्रमाणात संपन्न झाला. वेगवेगळ्या गावातील जनता अक्कलकोट मध्ये कामधंदे नसल्यामुळे पुणे येथे स्थायिक झालेले आहेत वंचित बहुजन आघाडी चे अधिकृत उमेदवार श्री संतोष कुमार इंगळे यांच्याबरोबर हितगुज करण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आलेला होता या मेळाव्याची प्रमुख आकर्षण आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचे ज्येष्ठसहकारी भारिप बहुजन महासंघापासून आतापर्यंत आदरणीय बाळासाहेबांचे साथ न सोडणारे पुणे वंचित बहुजन आघाडीचे नेते वसंतदादा साळवे यांचा मोलाचे मार्गदर्शन यावेळी या मेळाव्यास लाभले आणि वंचित बहुजन आघाडी सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे यांचेही मनोगत यावेळी उपस्थित रहिवाशांना करण्यात आला हा
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चंद्रकांत शिंगे (बनसोडे) राजु कांबळे मधुकर दुपारगुडे राम हल्ले रमेश वटार ,चंदू वटार, दशरथ मडीखांबे, अजित गायकवाड, याचबरोबर सर्व कार्यकर्त्यांनी अत्यंत मेहनत घेऊन हा मेळावा यशस्वी केला.

- Advertisement -spot_img
spot_img

Related Articles

Latest Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img