दक्षिण पोलिसांनी जपली सामाजिक बांधिलकी, मुगळीतील पारधी वस्तीत पोलिसांनी साजरी केली दिवाळी
अक्कलकोट : प्रतिनीधी
तालुक्यातील मुगळी येथील पारधी वस्तीमध्ये अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश स्वामी व कर्मचाऱ्यांनी दिवाळी साजरी केली. या त्यांच्या सामाजिक दातृत्वाबाबत सर्वत्र कौतुक व्यक्त होत आहे.
अक्कलकोट विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना सध्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा कार्यकाळ हा रात्रीचा दिवस असून अशा परिस्थितीत वेळात वेळ काढून पोलीस निरीक्षक स्वामी व पोलीस कर्मचाऱ्यांनी मुगळी येथील पारधी वस्तीमध्ये असलेल्या कुटुंबांना दिवाळीनिमित्त लागणारे सर्व साहित्य वाटप केले आणि त्यांच्यासोबत दिवाळी साजरी केली.
पारधी समाज वस्तीत पोलीस अधिकारी व कर्मचारी पोहोचताच समाज भयभीत होतो. मात्र पोलीस निरीक्षक महेश स्वामी व कर्मचाऱ्यांनी आपल्याबरोबर दिवाळी साजरी करण्यासाठी आल्याचे सांगताच उपस्थित समाज बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. त्यानंतर उपस्थितांना दिवाळीचा फराळ,
फटाके देऊन त्यांच्यासमवेत यांच्या नेतृत्वाखाली पोलीस स्वामी यांनी दक्षिण ठाण्याच्या हद्दीत व सुव्यवस्था अबाधित राखण्याबरोबरच सामाजिक देखील नेहमीच अग्रेसर आहेत. याप्रसंगी दक्षिण ठाण्याचे पोलीस अजय भोसले, राजू कोळी, सुभाष दासरे, नबिलाल मियावाले , श्रीकांत चव्हाण यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित
दिवाळी साजरी करण्यात आली. निरीक्षक महाराष्ट्र पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली तर अपर पोलीस अधीक्षक प्रीतमकुमार यावलकर, उपअधीक्षक विजयालक्ष्मी कुर्री व उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावर पोलीस कायदा कार्यात ठरले पोलीस कर्मचारी भोसले, मियाँवाले होते.