शिरवळवाडी सुपुत्र श्री अशोक कोगनुरे सर यांना कन्नड सेवारत्न पुरस्काराने सन्मानित
अक्कलकोट/हणमंत घोदे
गडीनाड कन्नडिगर बृहुत प्रबोधन संमेलन कडून देण्यात येणारा कन्नड सेवारत्न पुरस्कार शिरवळवाडी चे सुपुत्र जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड शाळा शिरवळवाडीचे मुख्याध्यापक श्री अशोक कोगनुरे सर यांना प्रदान करण्यात आला.उमदी ता जत येथील झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात श्री अशोक कोगनुरे सर यांना कन्नड चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ विनोदी कलाकार श्री.दोडण्णा यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले