18.3 C
New York
Sunday, May 18, 2025

Buy now

spot_img

जिल्हा परिषद मराठी शाळा खैराट येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

जिल्हा परिषद मराठी शाळा खैराट येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

वागदरी : प्रतिनीधी

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा खैराट येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे प्रथम नागरिक सौ सुनंदाताई मठपती सरपंच ह्या होत्या .प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच ,सर्व ग्रामपंचायत सदस्य, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष ,सर्व सदस्य ,पोलीस पाटील ,गावातील प्रतिष्ठित नागरिक हे होते. प्रारंभी शालेय व्यवस्थापन सदस्य अध्यक्ष शिवनिंगप्पा काणे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले . प्रथमतः शाळेच्या प्रगती विषयी मुख्याध्यापक चंद्रकांत बटगेरी यांनी प्रास्ताविक सादर केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांचे भाषणे तथा विविध गुणदर्शन कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने सादर करण्यात आले इयत्ता पहिली ते सातवी सर्व मुला-मुलींनी सहभाग नोंदवून देशभक्तीपर गीत, लोकगीत, अशा सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी सादर केले. शाळेच्या विकासासाठी सर्व नागरिकांनी आपापल्या परीने सहकार्य करावे असे मत श्री सिद्धाराम मठपती यांनी व्यक्त केले. यावर्षी ग्रामपंचायत खैराट यांच्याकडून पहिली वर्गाचे नूतनीकरण करून वर्ग सजावट साठी बोलक्या भिंती  हा उपक्रम राबवण्यात आला. व तसेच श्री सिद्धाराम मठपती (मा पंचायत समिती सदस्य) यांनी आपल्या आईच्या स्मरणात कै.शांताबाई शिवया मठपती यांच्या स्मरणात शाळेसाठी (CCTV) सीसीटीव्ही चार कॅमेरे बसवून देण्यात आले शाळेच्या प्रगती बाबत ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आणि जिल्हा परिषद शाळेची अशीच प्रगती होईल असे आश्वासन मुख्याध्यापकाकडून देण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री विनोद मुरटे, श्रीम अंदुरकर मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालूसिंग राजपूत यांनी केले तर आभार श्री मनोज माने सरांनी मानले.

- Advertisement -spot_img
spot_img

Related Articles

Latest Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img