सोलापूर जिल्हा आणि माढा लोकसभा विभागासाठी डिजिटल मीडियाचे जिल्हाध्यक्षपदी महेश गायकवाड यांची निवड
सोलापूर प्रतिनीधी
सोलापूर जिल्ह्यातील
वरिष्ठ आणि रोखठोक व निर्भीड पत्रकार सुयश मीडिया चे ब्युरो चिफ महेश गायकवाड यांची सोलापूर जिल्हा आणि माढा लोकसभा क्षेत्रासाठी डिजीटल मीडिया चे जिल्हा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.
काल दिनांक 10 एप्रिल 25 रोजी मिरज येथे पार पडलेल्या डिजीटल मीडिया च्या राज्यस्तरीय अधिवेशनात ही निवड करण्यात आली आहे. या निवडी नंतर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते त्यांचा अधिवेशन स्थळी सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमारभाऊ गोरे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य संघटक आणि भोकरे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज चे प्रमुख संजय भोकरे
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणी डॉ विश्वास राव आरोटे इलेक्टोनिक मीडियाचे विधिमंडळ वार्ताहर संघाचे रणधीर कांबळे डिजिटल मीडिया प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यांच्यासह इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.
महेश गायकवाड हे सोलापूर जिल्ह्यातील ज्येष्ठ आणि वरिष्ठ पत्रकार असून त्यांनी आज पर्यंत विविध वृत्तपत्रांमध्ये कामकाज केले आहे गेल्या 40 वर्षांपासून ते पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. बहुजन आणि आंबेडकरी चळवळीसाठी त्यांनी आपली सर्वाधिक पत्रकारिता खर्ची घातली आहेत. राज्यातील आणि सोलापूर जिल्ह्यातील गंभीर घटना व प्रसंगावर त्यांनी प्रकाश टाकून अनेक प्रकरणे त्यांनी मार्गी लावून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. अन्याय अत्याचार यावर आवाज उठवत त्यांनी सतत निर्भीड आणि रोखठोक पत्रकारिता केली आहे.
सद्या त्यांनी स्वतःच्या सुयश डिजीटल मीडिया ग्रुप ची जबाबदारी सांभाळत असून साप्ताहिक चैत्यभूमी हे वृत्तपत्र नेटाने चालवत आहेत.
त्यांच्या या निवडी बद्धल अक्कलकोट चे आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी रिपाइं चे महाराष्ट प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे आर पी आय चे नगरसेवक आणि तरुणांचे आयकॉन अजित भाऊ गायकवाड यांच्यासह रॉयल नगरदेवक मिलन दादा कल्याणशेट्टी, भीमशक्ती सामाजिक संघटनेचे राज्य सचिव संजय रणदिवे भीमशक्तीचे राज्य उपाध्यक्ष सुबोध वाघमोडे कोन्हळी गावचे माजी सरपंच आणि आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते रमेश बनसोडे अक्कलकोट तालुका RPI चे तालुका अध्यक्ष अविनाश मडीखांबे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ अक्कलकोट शाखेचे अध्यक्ष आणि वरिष्ठ पत्रकार आणि दैनिक यश सिद्धी चे मुख्य संपादक कमलाकर सोनकांबळे , लोकशाही टीव्ही चॅनेल चे पत्रकार चंद्रशेखर भांगे साहेब, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अक्कलकोट तालुका सचिव विश्वनाथ राठोड, धाराशिव जिल्ह्याचे माजी क्रीडा अधिकारी बनसोडे साहेब, उद्योजक मधुकर सुरवसे,जतचे तहसीलदार चंद्रशेखर लिंबारे साहेब, गोगावच्या लोकप्रिय सरपंच सौ वनिता मधुकर सुरवसे अनेकांनी अभिनंदन केले असून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.