छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित निघाली दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल ची भव्य आणि दिव्य रॅली
सोलापूर l प्रतिनिधी
लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित आणि शाळेच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल ची भव्य आणि दिव्य रॅली आज गुरुवार दिनांक ,26 जून रोजी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथून काढण्यात आली.डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथून ही भव्य रॅली शाळेच्या परिसरातील प्रमुख मार्गावरून निघून शाळेत विसर्जित झाली
भव्य रॅली
छ.शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित आज गुरुवार दिनांक 26 जुन 25 रोजी सकाळी 9 वाजता दि. बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल च्या वतीने विद्यार्थ्यांची भव्य दिव्य रॅली येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथून काढण्यात आली होती या रॅली मध्ये नर्सरी पासून ते सर्व वर्गांचे विद्यार्थी हातात शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त विविध घोषवाक्ये आणि या घोषवाक्यामधून सामाजिक संदेश देणारे फलक हातात घेऊन उत्स्फूर्त पणे सहभागी झाले होते.
दि.बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलच्या प्रिन्सिपल तरन्नुम शेख यांनी संस्थेचे प्रमुख संदीप उडानशिव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्कूल च्या सर्व स्टाफ यांच्या सहकार्याने व पालकांच्या उपस्थिती मध्ये ही भव्य रॅली काढण्यात आली. गुरूवार दि. २६/०६/२०२५ रोजी शाळेचा ‘ दहावा वर्धापन दिन’ असल्यामुळे आणि छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती चे निम्मित साधून या रॅली चे आयोजन करण्यात आले होते.अशीही माहिती प्रिन्सिपल शेख यांनी दिली.
सर्व विद्यार्थ्यांनी पांढरा युनिफॉर्म घालून सकाळी ठीक 8.30 वाजता आंबेडकर उद्यानात हजर झाले होते.ही अतिशय सुंदर अशी भव्य दिव्य रॅली सकाळी 9.00 वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यानातून सुरू झाली आणि ही रॅली दुपारी एक वाजता स्कूल च्या मैदानात समाप्त करण्यात आली ,सर्व पालक तसेच शाळेचा सर्व स्टाफ यावेळी उपस्थित होते प्ले ग्रुप मधील लहान बालक विद्यार्थी सतेज शंकर गायकवाड हा या रॅली मध्ये उत्स्फूतपणाने सहभागी झाला होता.