सागर दादा कल्याणशेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त वंचित घटकातील लोकांना साहित्य वाटप
अक्कलकोट प्रतिनिधी
अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथे सागर दादा कल्याणशेट्टी युवा मंचच्या वतीने श्याम बाबर यांच्या वतीने गरजू वंचित घटकातील लहान मुले, युवक, महिला, यांना कपडे व साडी वाटप करण्यात आले
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पंचायत समिती सदस्य धोंडाप्पा यमाजी हे होते यावेळी शेळके प्रशाला चेअरमन बसवराज शेळके, भाजपा तालुकाउपध्यक्ष प्रदीप जगताप, गोगांवचे उपसरपंच कमलाकर सोनकांबळे, सुनील सावंत या मान्यवराच्या हस्ते गरजूंना कपडे व साहित्य वाटप करण्यात आले यावेळी बोलताना महादेव सोनकवडे म्हणाले की सागर दादा कल्याणशेट्टी युवा मंचच्या माध्यमातून श्याम बाबर यांनी दरवर्षी वेगवेगळ्या उपक्रम राबवत असतो महिला दिन असू दे भाग्यवंती देवी यात्रा असू दे परमेश्वर यात्रा असू दे परमेश्वर पर्व आराधना महोत्सव असू दे सागर दादा कल्याणशेट्टी युवा मंच वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत असतो वंचित घटकातील लोकांसाठी विविध कार्यक्रम त्यांनी वागदरी सह परिसरात गोरगरीब जनतेसाठी राबवत असतो वागदरी येथे ज्या समाजाला आज पर्यत कुठली सुविधा मिळाले नाही अशा वंचित घटकासाठी लोकांसाठी श्याम बाबर यांनी विविध प्रकारचे साहित्य वाटप आज सागर दादा कल्याणशेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त करीत आहे हे कौतुकास्पद आहे
यावेळी रमेश मंगाने, वीरभद्र पुरत शशी कोळी, असला मुल्ला, सुरेश सोनकांबळे यास सामाजिक क्षेत्रातील व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते