24.1 C
New York
Thursday, July 25, 2024

Buy now

spot_img

सरपंच वनिता सुरवसे यांच्या हस्ते राणी सुरवसे व भौरमा तावरखेड यांना नारीशक्ती पुरस्कार देऊन सन्मान 

पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायत गोगांव वतीने नारीशक्ती पुरस्कार वितरण

  • सरपंच वनिता सुरवसे यांच्या हस्ते राणी सुरवसे व भौरमा तावरखेड यांना नारीशक्ती पुरस्कार देऊन सन्मान 

अक्कलकोट ( प्रतिनीधी ) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायत गोगाव यांच्या वतीने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल गावातील दोन महिलांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोगावचे सरपंच सौ वनिता सुरवसे ह्या होत्या,प्रमुख उपस्थिती उपसरपंच कमलाकर सोनकांबळे, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक दयानंद चोळे,ग्रामसेवक विक्रम घाटे, कल्लप्पा बनसोडे हे होते. यावेळी प्रतिमा पूजन ज्येष्ठ सदस्य प्रदीप जगताप व पोलीस पाटील चंद्रकला गायकवाड यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
बचत गटामध्ये उल्लेखनीय कार्य करून स्वतः गारमेंट कापड दुकानाचा व्यवसाय चालू केल्यामुळे, सामाजिक व आर्थिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सौ राणी विकास सुरवसे यांना सरपंच सौ वनिता सुरवसे यांच्या हस्ते सन्मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले व ग्रामीण भागातील अशिक्षित महिलांना आरोग्य विषयक जनजागृती करून त्यांना आरोग्य विषयक माहिती देऊन सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सौ भौरम्मा तावरखेड यांचा सदस्या सौ महादेव मुलगे यांच्या हस्ते सन्मानपत्र , सन्मानचिन्ह देऊन गौविण्यात आले.
यावेळी बोलताना सरपंच वनिता सुरवसे म्हणाल्या की, महीलाने स्वतःच्या पायावर उभे राहावे,आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुढे आहेत आत्ता ग्रामीण महिला ही जागृत होत आहेत, महिलांनी घराबाहेर पडले पाहिजे, स्वतःच्या हिमतीवर व्यवसाय चालू केले पाहिजे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी स्वतः हिम्मत न हरता स्वतःच्या पायावर उभे राहून इतिहास रचला, अनेक संघर्षांना तोंड द्यावे लागले तरी त्यांनी न खचता त्याने लढत राहिल्या त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण सर्व महिलांनी स्वतःचे पायावर उभे राहणे गरजेचे आहे, आजच्या पुरस्कार्थी महिलांचे मनापासून अभिनंदन. यावेळी अंगणवाडी सेविका तेजाबाई गुरव,भाग्यश्री सोनकवडे यांच्यासह बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते, कार्यक्रम सूत्रसंचालन व आभार उपसरपंच कमलाकर सोनकांबळे यांनी केले.

- Advertisement -spot_img

Related Articles

Latest Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img