आई वडिलांना न सांभाळणाऱ्यांचा वारस नोंद होणार नाही, सरपंच सौ वनिता सुरवसे यांचा मासिक सभेत निर्णय
गोगांव ग्रामपंचायतीने केले उमेश काटे यांच्या हस्ते 101 झाडाचे वृक्षारोपण
अक्कलकोट ( प्रतिनीधी ) : गोगांव येथे ग्रामपंचायत मासिक सभेत सरपंच सौ वनिता सुरवसे यांच्याकडुन त्याच्या संकल्पनेतून मांडण्यात आलेल्या विषयावर चर्चा करण्यात आले, गावात आई वडिलांना न सांभाळणाऱ्या मुलांच्या वारसासाठी भविष्यात ग्रामपंचायत कडून कुठलाच दाखला व सही देण्यात येणार नाही असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. या ठरावाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ग्रामपंचायत गोगांव यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळा पासून ग्रामपंचायत पर्यंत दोन्ही बाजूला सहायक गट विकास अधिकारी उमेश काटे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले, यावेळी सरपंच वनिता सुरवसे, उपसरपंच कमलाकर सोनकांबळे, जेष्ठ सदस्य प्रदीप जगताप, केंद्र प्रमुख बा ना चव्हाण, कृषी विस्तार अधिकारी पाटरुट, ग्रामसेवक विक्रम घाटे, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण बिराजदार, शरणप्पा कलशेट्टी, मुख्याध्यापक दयानंद चोळे, कृषी सहायक सिद्धाराम शिरगापुरे, डॉ लिंगराज नडगेरी आदी उपस्थित होते.
गोगांव ग्रामपंचायतच्या वतीने वृक्षारोपण झाल्यानंतर जिल्हा परिषद शाळेत वृक्षारोपण करण्यात आले व आलेल्या मान्यवरांचे स्वागत करण्यात आले यावेळी बोलताना उमेश काटे म्हणाले की, गोगांव ग्रामपंचयतीचे कार्य कौतुकास्पद आहे, सरपंच वनिता सुरवसे यांनी आई वडील यांना न सांभाळणाऱ्या मुलांचे भविष्यात वारस नोंदी साठी कुठल्याही प्रकारचे ग्रामपंचायत दाखला न देण्याचे एक इतिहासिक निर्णय घेतले आहे हे कौतुस्पद असून जिल्ह्यातील असा ठराव घेणारी ही पहिली ग्रामपंचयत आहे. सरपंच हे महिला असून देखील गावाच्या विकासासाठी कायम प्रयत्नशिल असतात व ग्रामपंचायतीतर्फे सतत नवीन नवीन उपक्रम राविण्यासाठी प्रयत्नशील असतात माझ्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले एक व्यक्ती एक झाड, एक पद एक झाड अश्याप्रकारे सर्वांनी आपल्या आपल्या सोयीने झाडे लावण्याचे व जागविण्याचा काम केले पाहिजे आज वृक्षारोपण करणे काळाची गरज असून शुद्ध स्वच्छ वातावण निर्मिती साठी झाडे लावणे आवश्यक आहे. मुलांना आपल्या घरासमोर किंवा शेतामध्ये किमान एक तरी झाड लावावे.
यावेळी झाडाच्या सुरक्षा साठी गावातील सेवा निवृत्त पोलिस अधिकारी फकिरप्पा बनसोडे, परमेश्वर गायकवाड, डॉ लिंगराज नडगेरी, पोस्ट मास्तर भूषण साठे यांनी सुरक्षा जाळी देण्याचे घोषणा केले
यावेळी अंगणवाडी सेविका भाग्यश्री सोनकवडे, तेजाबाई गुरव, बाळप्पा जावळे, विजयकुमार गायकवाड, फूडलीक वाघमारे, शंकर कारभारी , महादेव चव्हाण ज्योती आलूरे आदी उपस्थित होते.