24 C
New York
Sunday, June 23, 2024

Buy now

spot_img

संघर्ष सामाजिक संस्थेच्या वतीने सागर कल्याणशेट्टी यांच्या वाढदिवसा निमित आरोग्य केंद्रात फळ वाटप

संघर्ष सामाजिक संस्थेच्या वतीने सागर कल्याणशेट्टी यांच्या वाढदिवसा निमित आरोग्य केंद्रात फळ वाटप

 

अक्कलकोट( प्रतिनीधी) हन्नुर ग्रामपंचायत उपसरपंच अक्कलकोट तालुक्यातील पहिल्यांदा बैलगाडी शर्यत भरवून तालुक्यात एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकप्रिय युवा नेतृत्व सागर दादा कल्याणशेट्टी यांच्या वाढदिवसा निमित्त संघर्ष सामाजिक संस्थेच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र वागदरी येथे रुग्णांना फळे वाटप करण्यात आले
या कार्यक्रम अध्यक्षस्थानी एस एस शेळके प्रशालाचे चेअरमन बसवराज शेळके हे होते प्रमुख उपस्थिती ग्रामपंचायत सदस्य श्रीशैल ठोबरे, गोगांव उपसरपंच कमलाकर सोनकांबळे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शरणपा मांगणे, डॉ. साधना पाटील, घळाया मठपती, किरनळी सरपंच सतीश कणमुसे संघर्ष सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्याम बाबर, महादेव सोनकवडे, ग्रामपंचायत सदस्य पंकज सुतार, मकबूल कणमुसे, सुनील सावंत उपस्थित होते
यावेळी बोलताना कमलाकर सोनकांबळे म्हणाले की, सागर दादा कल्याणशेट्टी हे युवाच्या व ग्रामीण भागातील शेतकऱ्याचे विविध समस्यासाठी सतत लढत राहतात ते स्वतः शेतकरी असून त्यांनी तालुकास्तरीय बैलगाडी शर्यत भरवून तालुक्यात शेतकऱ्यांना ऊर्जा देण्याचे काम करत असतात, शाम बाबर हे गेल्या पंधरा वीस वर्षापासून सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेत असतात त्यांनी संघर्ष सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अनेक विविध समाजोपयोगी कार्य सतत करत असतात , गोर गरीब लोकांच्या कुठल्याही समस्या ,तक्रार असेल तर त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन काम करतात सागर दादा कल्याणशेट्टी यांच्या वाढदिसानिमित्त रुग्णांना फळे वाटप करण्याचे स्तुत्य उपक्रम त्यांनी राबीवले आहे

यावेळी अस्लम मुल्ला, विजयकुमार गायकवाड, शिवाजी सांवत, आरोग्य सेविका निलोफर नदाफ, आशा वाकडे, यासह सर्व कर्मचारी उपस्थित होते सूत्रसंचालन महादेव सोनकवडे यांनी केले आभार श्रीशैल ठोबरे, यांनी मानले

- Advertisement -spot_img

Related Articles

Latest Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img