मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी रासप व रिपाईच्या वतीने एकदिवसीय साखळी उपोषण संपन्न
अक्कलकोट (प्रतिनिधी) :- मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे यासाठी राष्ट्रीय समाज पक्ष व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने अक्कलकोट तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय साखळी उपोषण करण्यात आले. सर्व प्रथम छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन उपोषणाला सूरुवात करण्यात आले. यावेळी श्री स्वामी समर्थ देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश इंगळे, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले, पंचायत समितीचे माजी विरोधी पक्षनेते बाळासाहेब मोरे, ज्येष्ठ नेते सुरेश सुर्यवंशी यांनी उपोषण स्थळी येऊन आभार व्यक्त केले. याप्रसंगी राष्ट्रीय समाज पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनिल बंडगर, रिपाइंचे अक्कलकोट तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे,शहर अध्यक्ष अजय मुकणार, रासपचे माजी तालुकाध्यक्ष दत्तात्रय माडकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी रासपचे अक्कलकोट तालुका युवक आघाडीचे अध्यक्ष दाजी कोळेकर, तालुका उपाध्यक्ष विलास पाटील, सलगर जिल्हा परिषद गट प्रमुख रेवणसिध्द शेरी,रिपाइंचे जिल्हा चिटणीस सैदप्पा झळकी, तालुका सरचिटणीस राजु भगळे, तालुका कार्याध्यक्ष राजू बोरगांवकर,युवक तालुकाध्यक्ष अप्पा भालेराव,गुरुशांत दोडमनी, विजयकुमार पोतेनवरु, विठोबा कोळेकर, नागनाथ शिरोळे,अंबादास शिंगे,सैपन शेख,रशीद खिस्तके ,मैनोद्दीन कोरबू, कृष्णा दोडमनी, दस्तगीर मुजावर,तम्मा दसाडे, बंटी मडिखांबे, दत्ता कांबळे,शुभम मडिखांबे, चंद्रकांत गायकवाड आदी उपस्थित होते.