18.1 C
New York
Thursday, May 9, 2024

Buy now

संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी सोमवारपासून साखळी उपोषणास सुरुवात : महेश इंगळे

संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी सोमवारपासून साखळी उपोषणास सुरुवात : महेश इंगळे

मराठा आरक्षणप्रश्नी प्रसंगी गोळ्या झेलू, अभी नही तो कभी नही, अक्कलकोट तालुक्यातील मराठा समाजाचा एल्गार

अक्कलकोट दि.29 : ( विशेष प्रतिनिधी)
मराठा आरक्षणप्रश्नी प्रसंगी गोळ्या झेलू, अभी नही तो कभी नही, अशी परिस्थिती असून या आरक्षणाच्या लढ्याकरिता अक्कलकोट तालुका व शहरातील समाज बांधवांनी एकत्रित येवून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लढत असलेले संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी सोमवारपासून साखळी उपोषणास सुरुवात करण्यात येणार असल्याची घोषणा मराठा समाजाचे नेते महेश इंगळे यांनी केले.*

ते रविवारी श्री फत्तेसिंह शिक्षण संस्थेच्या सर्जेराव जाधव सभागृहात सकल मराठा समाजाच्यावतीने संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी आयोजित बैठकीप्रसंगी महेश इंगळे हे बोलत होते.

दरम्यान शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित समाज बांधवांच्यावतीने करण्यात आले.

याप्रसंगी समाजाचे ज्येष्ठनेते राजीव माने, शिवाजीराव पाटील, अमोलराजे भोसले, बाबासाहेब निंबाळकर, विठ्ठलराव मोरे, श्रीमती ताराबाई हांडे, माया जाधव, मिरा ब्रद्रुक, बाळासाहेब मोरे, सुधाकर गोंडाळ, बापूजी निंबाळकर, दत्तात्रय पाटील, अरुण साळुंके, सुभाष गडसिंग, संतोष जाधव, अमर शिंदे, स्वामीराव सुरवसे, तम्मा शेळके, संजय मोरे याच्यासह समाज बांधव उपस्थित होेते.

महेश इंगळे पुढे बोलताना म्हणाले, आरक्षण हा कळीचा मुद्दा असून तो मराठा समाजाला मिळणे गरजेचे आहे. आजवर समाजाने आरक्षणाकरिता शांततेने आंदोलने केली. आता मात्र मराठा समाज हा रस्त्यावर उतरलेला आहे. समाजाच्या तीव्र भावना लक्षात घेवून शासनाने त्वरीत मराठा समाजाला आरक्षण द्यावेत असे यावेळी महेश इंगळे म्हणाले.

यावेळी राजीव माने यांनी मराठा आरक्षणा बाबतची माहिती विस्तृतपणे दिले. समाजाचा होणारा फायदा याबाबतची माहिती सांगून सोमवारी होणार्‍या साखळी उपोषणास बहुसंख्येने समाज बांधव उपस्थित राहण्याचे आवाहन माने यांनी केले.

याप्रसंगी बाबासाहेब निंबाळकर यांनी मराठा आरक्षणाबाबत सुरु असलेले आंदोलनाच्या माध्यमातून जरांगे पाटील यांची योग्य भूमिका असल्याचे सांगून त्यांच्या पाठिशी खंबीरपणे समाज बांधवांनी उभे रहावे.

आरक्षणाबाबत निंबाळकर यांनी आरक्षणाबाबत वर्षनिहाय माहिती सांगून आरक्षणास विरोध करणार्‍यांवर कडक शब्दात टिका केली.

याबरोबरच अमोलराजे भोसले यांनी तालुका व शहरातील समाज बांधवांनी आजवर केलेल्या आंदोलनास ज्याप्रमाणे सहभागी झालात. त्याप्रमाणे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी आयोजित साखळी उपोषणास उपस्थित राहण्याचे आवाहन भोसले यांनी केले.

बाळासाहेब मोरे यांनी मराठा आरक्षणा बाबतची भूमिका विशद करुन कुरनूर व मराठवाडीने मराठा आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही राजकीय पक्ष व नेत्यास गावात प्रवेश नाही असा प्रवेश बंदीचा फलक लावले. त्याप्रमाणे आपआपल्या गावात लावून जरांगे-पाटलाच्या उपोषणास पाठिंबा द्यावा व अक्कलकोट येथील साखळी उपोषणास उपस्थित राहण्यास आवाहन मोरे यांनी केले.

याप्रसंगी अविनाश कदम, प्रदिप सुरवसे, संजय मोरे यांनी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर समुचित मनोगत व्यक्त केले.

यावेळी शिवा संघटनेचे प्रा.परमेश्वर अरबाळे यांनी बैठकीस्थळी येवून संघटनेचा मराठा आरक्षणास पाठिंबा असल्याचे पत्र दिले.

यावेळी ज्येष्ठ समाज बांधव स्व.अरविंद कोकाटे यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

अवगुणी गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडी फोडणार्‍या समाज बांधवांचा या बैठकीत अभिनंदनाचा ठराव संमत करण्यात आला.

यावेळी प्रदिप जगताप, अतुल जाधव, मनोज निकम, प्रविण देशमुख, शितल जाधव, संजय गोंडाळ, प्रविण घाटगे, योगेश पवार, वैभव मोरे, संतोष भोसले, पिटू साठे, आकाश शिंदे, चेतन जाधव, स्वामीराव मोरे, आतिश पवार, मनोज गंगणे, अभिमन्यू ताड, आबा सुर्यवंशी, प्रशांत भगरे, गोटू माने, टिनू पाटील, बालाजी जाधव, राजेंद्र सुरवसे, मोहनराव चव्हाण, मारुती बावडे, प्रविण बाबर, अमर पाटील, निखिल पाटील, राजेंद्र पवार, भरत राजेगावकर, सुखदेव चव्हाण, प्रथमेश पवार, प्रणित पाटील, रणजित जाधव, नागराज पाटील, ज्ञानेश्वर भोसले, मंगेश सुर्यवंशी, श्रीशैल कुंभार, समर्थ घाटगे, पवन पाटील, राम जाधव, किरण जाधव, ज्योतीबा चव्हाण, स्वामीनाथ बेंद्रे, यांच्यासह शहर व तालुक्यातील बहुसंख्येने मराठा समाज बांधव उपस्थित होता. बैठकीचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन प्रा.प्रकाश सुरवसे यांनी केले.

समाज बांधवांनी सोमवार, दि.30 ऑक्टोंबर रोजी सकाळी 10 वा.नवीन तहसिल कार्यालय येथे शहर व तालुक्यातील मराठा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावेत असे आवाहन सकल मराठा समाजाच्यावतीने करण्यात आले आहे.

- Advertisement -spot_img

Related Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

Latest Articles