सकल मराठा समाज अक्कलकोट तालुक्याच्या वतीने मराठा आरक्षण करिता अक्कलकोट-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको आंदोलन
अक्कलकोट, ( प्रतिनीधी ) दि.2 : अक्कलकोट शहर व तालुक्यातील समस्त सकल मराठा समाजाच्यावतीने मराठा आरक्षण व मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी गुरुवारी सकाळी 9.30 ते 11.30 वाजता अक्कलकोट-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर (रिलायन्स पेट्रोल पंप समोर) रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
अक्कलकोट तालुक्यातील शहर व ग्रामीण भागातील सर्व मराठा बांधवानी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सुमारे दीड ते दोन तास अक्कलकोट-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग बंद केल्याने 2 ते 3 किलोमीटरपर्यंत दुतर्फा वाहनांची लांबच-लांब रांगा लागल्या होत्या.
एकच मिशन मराठा आरक्षण! मराठा समाजाच्या आरक्षण लढ्याकरिता अक्कलकोट तालुका व शहरातील समाज बांधवांनी एकत्रित येवून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लढत असलेले संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी सोमवारपासून साखळी उपोषणास प्रारंभ करण्यात आले असून चौथ्या दिवशी साखळी उपोषण सुरु आहे.
याप्रसंगी सकल मराठा समाजाचे ज्येष्ठ नेते सुरेशचंद्र सुर्यवंशी, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, महेश इंगळे, अमोलराजे भोसले, बाबासाहेब निंबाळकर, प्रविण देशमुख, बाळासाहेब मोरे, संतोष फुटाणे, प्रा.प्रकाश सुरवसे, बाळासाहेब मोरे, प्रवीण घाटगे, ठाकरे गटाचे शिवसेना तालुका प्रमुख आनंद बुक्कानुरे, सुनील कटारे, विलासराव सुरवसे, निखिल पाटील, सोपानराव गोंडाळ, श्रीमती ताराबाई हांडे, माया जाधव, सुभाष गडसिंग, स्वामीराव सुरवसे, तम्मा शेळके, प्रदिप जगताप, मनोज निकम, कुमार सुरवसे, वैभव नवले, शितल जाधव, संजय गोंडाळ, प्रविण घाटगे, योगेश पवार, वैभव मोरे, चंद्रकांत सोनटक्के, प्रथमेश पवार, संतोष भोसले, पिटू साठे, आकाश शिंदे, सागर गोंडाळ आतिश पवार, मनोज गंगणे, गोटू माने, टिनू पाटील, राजेंद्र पवार, रणजित जाधव, ऋषिकेश लोणारी, भोसले, श्रीशैल कुंभार, समर्थ घाटगे, मैनुद्दीन कोरबु, महेश दणके, रवि कदम, अंकुश पवार, सुनिल पवार, गोविंद शिंदे, रोहन शिर्के, भरत राजेगावकर, महेश डिग्गे, दिनेश बंडगर, शुभम चव्हाण, अंकुश पवार, राजू माकणे, पवन पाटील, ज्योतीबा चव्हाण, स्वामीनाथ बेंद्रे, पिंटू मचाले, ओंमकार महाडिक, ज्ञानेश्वर पुजारी, किरण साठे, सुरेश कदम, नितीन शिंदे, अमित थोरात, नितीन शिंदे, किरण शिंदे, गोरखनाथ माळी, कल्याणराव देशमुख, सागर गोंडाळ, गिरीष पवार, राहूल इंडे, प्रकाश लोंढे, गणेश लांडगे यांच्यासह समाज बांधव उपस्थित होेते.