22.4 C
New York
Tuesday, July 23, 2024

Buy now

spot_img

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी गोगांव च्या सरपंच वनिता सुरवसे यांचा पाठींबा

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी गोगांव च्या सरपंच वनिता सुरवसे यांचा पाठींबा

अक्कलकोट ( प्रतिनीधी ): सध्या महाराष्ट्रात मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलन चालू आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणास पाठिंबा देण्यासाठी अक्कलकोट येथे सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषणास सुरुवात करण्यात आली असून त्यास गोगांवच्या सरपंच वनिता सुरवसे यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे, त्या सोलापूर जिल्ह्याच्या सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र च्या जिल्हा समन्वयक आहेत.
सरकारने लवकर निर्णय न केल्यास जिल्ह्यातील सर्व सरपंच, उपसरपंच सदस्य यांचा मंत्रालयवर मोर्चा काढून निषेध करून ग्रामपंचायतीचे कामकाज बंद ठेवू असा इशाराच सरकारला सरपंच वनिता सुरवसे यांनी दिला आहे
गावगाडा चालवणाऱ्यां सर्व सरपंचानी सुद्धा पाठिंबा द्यावा असे आव्हान सरपंच वनिता सुरवसे यांनी केले आहे.
जेष्ठ सदस्य प्रदीप जगताप व उपसरपंच कमलाकर सोनकांबळे यांच्याकडून पाठिंब्याचे पत्र सकल मराठा समाजाचे शिष्ट मंडळ व वटवृक्ष देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश इंगळे, स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी विश्वस्त अमोल राजे भोसले, बाळासाहेब मोरे यांच्याकडे देण्यात आले आहे.
यावेळी प्रवीण देशमुख, शशिकांत पाटील, सुनील सावंत, राज यादव, शाम बाबर, प्रवीण घाटगे, मारुती शिंदे, यांच्या सह वागदरी जिल्हा परिषद गटातील मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

- Advertisement -spot_img

Related Articles

Latest Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img