कल्याणशेट्टी महाविद्यालयात वाड्मय मंडळाचे उदघाटन…
अक्कलकोट – महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्थेच्या मातोश्री गुरुबसव्वा कल्याणशेट्टी कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मराठी विभागाकडून वाड्मय मंडळाचे विवेक भित्ती पत्रकाचे उदघाटन संस्थेचे संचालक मा. मुकूंद पत्की यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी मा. प्रशांत अरबाळे व अध्यक्ष म्हणून संचालक मल्लिनाथ कल्याणशेट्टी हे उपस्थित होते..
यावेळी मुकूंद पत्की यानी बोलताना मराठी संतानी समाजातील रूढी,परंपरा,अंधश्रध्दा यावर प्रहार करणारे साहित्य निर्माण केले. प्रवचन,कीर्तन, भारूड, अभंग व निरूपणातून समाजप्रबोधनपर ग्रंथ साहित्याची निर्मिती केली. साहित्यातील संतांचे योगदान भरीव असल्याचे मत त्यानी व्यक्त केले..
यावेळी संचालक मल्लिनाथ कल्याणशेट्टी व गटशिक्षणाधिकारी प्रशांत अरबाळे यानीही आपले मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी प्राचार्य डॉ राजेंद्रसिंह लोखंडे यांनी प्रस्तावना करून मान्यवरांचे परिचय करून दिले. मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे नियोजन मराठी विभाग प्रमुख प्रा.तुकाराम सुरवसे, प्रा.भीम सोनकांबळे यानी केले. तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा.राजेश पवार, डॉ बाळासाहेब पाटील, डॉ शीतल झिंगाडे यानी प्रयत्न केले. सूत्रसंचलन मराठी विभागाचे विद्यार्थिनी कु मयुरी कोरे व अंबारांणी अचलेरे यांनी केले व पाहुण्यांचे आभार प्रा. तुकाराम सुरवसे यांनी केले.
विवेक भित्तिपत्रकाचे प्रकाशन
महाविद्यालयातील मराठी विभागाकडून प्रा.भीम सोनकांबळे संपादित विवेक भित्तिपत्रकाचे प्रकाशन संचालक मुकुंद पत्की व गटशिक्षणाधिकारी प्रशांत अरबाळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जेष्ठ संचालक मल्लिनाथ कल्याणशेट्टी यानी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.भित्तिपत्रकात कथा,कविता,चारोळे, वित्रटिका आदी साहित्य शब्दबद्ध केले होते.