16.7 C
New York
Sunday, September 29, 2024

Buy now

spot_img

श्री राम प्रतिष्ठान व भाजपच्या वतीने आ.सचिन कल्याणशेट्टी यांच्या वाढदिवस निमित्त 111 रक्तदात्यांनी दिले रक्तदान

श्रीराम प्रतिष्ठान व भारतीय जनता पार्टी वागदरी यांच्या वतीने आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

111 रक्तदात्यांनी दिले रक्तदान

अक्कलकोट ( प्रतिनीधी) अक्कलकोट विधानसभेचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त मौजे वागदरी तालुका अक्कलकोट येथे भारतीय जनता पार्टी वागदरी जिल्हा परिषद गट व श्रीराम प्रतिष्ठान वागदरी यांच्यावतीने आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन वागदरीचे तंटामुक्त अध्यक्ष शरणप्पा मंगाणे, शेळके प्रशालाचे चेअरमन बसवराज शेळके, भारतीय जनता पार्टीचे तालुका उपाध्यक्ष प्रदीप जगताप या मान्यवराच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रदीप पाटील, किरनळीचे सरपंच सतीश कणमुसे, गोगांवचे उपसरपंच कमलाकर सोनकांबळे, घालय्या मठपती, सागर दादा कल्याणशेट्टी युवा मंच तालुकाध्यक्ष श्याम बाबर यासह अनेक मान्यवर उपस्थित होते
या शिबिरास अक्कलकोटचे रॉयल नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी व हन्नूरचे उपसरपंच सागर कल्याणशेट्टी व युवा उद्योजक सागर कत्ते, यांच्या हस्ते प्रमाणपत्र व टीशर्ट वाटप करण्यात आले यावेळी बोलताना श्रीशैल ठोंबरे म्हणाले की वागदरी भागातील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व श्रीराम प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी यांनी भाजपा जिल्हा सरचिटणीस बसवराज शेळके यांच्या मार्गदर्शाखाली आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित रक्तदान शिबिरात 111 लोकांनी रक्तदान केल्याबद्दल त्याचे अभिनंदन एक चांगले सामाजिक उपक्रम श्री राम प्रतिष्ठान यांनी केले आहे आज देशात रक्त पुरवठा कमी आहे आपण आज केलेले रक्त एकट्याचे जीव वाचवण्यासाठी मदत होईल गणेश शिंदे व सौ. नागिनी शिंदे या पती पत्नी यांनी रक्तदान करून समाजामध्ये एक आदर्श निर्माण केले आहे
यावेळी सलग अठरा वेळा रक्तदान केल्याबद्दल विनोद घुगरे यांचे सत्कार नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी अक्षय ब्लड बँकचे कर्मचाऱ्यांचे सन्मान श्री राम प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले
यावेळी संतोष पोमजी, महादेव सोनकवडे, सुनील सावंत, महिला भाजपा तालुका उपाध्यक्ष जयश्री बटगेरी, उपसरपंच लक्ष्मीबाई पोमाजी, सरपंच जमादार,घोळसगाव सरपंच राजशेखर कीवडे, महांतेश आलूरे, बोरगाव सरपंच शाम स्वामी,
प्रकाश पोमाजी, वीरभद्र पुरंत, उपस्थित होते
रक्तदान शिबीर यशस्वी पणे पार पाडण्यासाठी श्रीराम सामाजिक प्रतिष्ठान चे परमेश्वर शेळके, मंजुनाथ पोमाजी, रमेश मंगाणे, विनोद घुगरे, विशाल सावंत, राम मोरे, शरण माशाळे, म्हाळापा धनगर, परमेश्वर देवकर, गुंडू नदाफ, योगीनाथ मातनळ्ळी, नसरोद्दीन मुल्ला, शिवानंद गवंडी, लक्ष्मण खराटे, व सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेतले

- Advertisement -spot_img

Related Articles

Latest Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img