नागणसुर कन्नड मुली शाळेचे केंद्रस्तरीय टॕलेट हंट स्पर्धेत उज्वल यश
कथाकथन स्पर्धेत अंबिका मायनाळे प्रथम,वक्तृत्व स्पर्धेत सौंदर्या मांग द्वितीय,चित्रकला स्पर्धेत शिलवंती कोळी द्वितीय क्रमांक पटकावून तालुकास्तरीय स्पर्धेसाठी निवड
अक्कलकोट:- ( प्रतिनीधी )
जिल्हा परिषद सोलापूर व पंचायत समिती शिक्षण विभाग अक्कलकोट यांच्या वतीने घेण्यात आलेल्या विद्यार्थी टॅलेंट हंट स्पर्धेत नागणसुर येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड मुली शाळेचे विद्यार्थीनी घवघवीत यश संपादन करून तालुकास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाले आहे .
दर वर्षी प्रमाणे जिल्हा परिषद शिक्षण विभाग सोलापूर आणि पंचायत समिती शिक्षण विभाग अक्कलकोट यांच्या वतीने ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देऊन व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठी विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास अंतर्गत कथाकथन,वक्तृत्व,चित्रकला,
निबंध ,समूहगीत गायन,लोकनृत्य आदी स्पर्धा घेतली जाते.शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी केंद्रस्तरिय स्पर्धा नागणसुर येथील शेळके प्रशालेत घेण्यात आले.मोठागट कथाकथन स्पर्धेत अंबिका मायानाळे प्रथम क्रमांक पटकाविला आहे.वक्तृत्व स्पर्धेत सौंदर्या मांग हिने द्वितीय क्रमांक पटकाविला आहे.तसेच चित्रकला स्पर्धेत शिलवंती कोळी हिने द्वितीय क्रमांक पटकावून तीनही विद्यार्थिनी तालुकास्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे तसेच मोठागट व लहान गट लोकनृत्य आणि समूहगीत गायन स्पर्धेत शाळेचे दोन्ही गटाने अनुक्रमे दोन्ही स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावून यशाची परंपरा कायम राखली आहे .
यशस्वी विद्यार्थ्यांना सांस्कृतिक विभाग प्रमुख मुख्याध्यापक मल्लप्पा कवठे ,विषय शिक्षक शरणप्पा फुलारी,राजशेखर खानापुरे,कल्लय्या गणाचारी,शांता तोळनुरे,लक्ष्मीबाई देगांव,लक्ष्मीकांत तळवार राजशेखर कूर्ले आदी शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले आहे.यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांचे गटशिक्षणाधिकारी प्रशांत अरबाळे,विस्तार अधिकारी भीमाशंकर वाले,केंद्रप्रमुख गुरुनाथ नरूणे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सदानंद मठपती,उपाध्यक्ष गजानंद रेवी,सर्व सदस्य,ग्रामपंचायतीचे सरपंच सुनीता चव्हाण,उपसरपंच धनराज धनशेट्टी,सर्व सदस्य पालक ग्रामस्थ अभिनंदन करून पुढील तालुकास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहे.