अक्कलकोट येथे विवेकानंद प्रतिष्ठान वतीने 30 मार्चला सामुदायिक विवाह सोहळा
अक्कलकोट ( प्रतिनीधी )दि 30 :- विवेकानंद प्रतिष्ठान अक्कलकोट तर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही अध्यक्ष तथा आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली 30 मार्च 2024 रोजी सायं. 6.41 वाजता गोरज मुहूर्तावर सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाच्या सोहळ्यात जास्तीत जास्त जोडप्यांचा विवाह लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
विवेकानंद प्रतिष्ठान अक्कलकोट सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, पर्यावरण, आरोग्य, क्रीडा, अध्यात्म आदी अनेक क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहे. विवेकानंद प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजातील सर्व स्तरातील लोकांना प्रोत्साहन देण्याचे कार्य निरंतर सुरु आहे. समाजातील सर्व स्तरातील लोकांना सामाजिक उपक्रमातून एकत्रित आणून समाजात बंधुत्व निर्माण करण्याचा प्रयत्न विवेकानंद प्रतिष्ठान करीत आहे. लग्न हा भारतीय जीवन संस्कृतीचा कणा आहे. विवाह हा एक जीवनातील महत्वाचा टप्पा आहे. आजच्या महागाईच्या काळात सर्वसामान्यांना लग्नाचा खर्च व नियोजन करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. समाज ऋण व विवाह वेळी येणाऱ्या अडचणी या सर्व गोष्टींचा विचार करून आ.सचिन कल्याणशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली विवेकानंद प्रतिष्ठानच्या माध्यमातून सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करीत आहेत. आजपर्यंत 556 जोडपी विवाह सोहळ्यामध्ये विवाहबद्ध झाली आहेत व अनेक वधू-वरांच्या संसाराला गती दिली आहे. विवेकानंद प्रतिष्ठान सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे हे 12 वे वर्ष आहे. विवाह सोहळ्यासाठी अक्कलकोट शहरासह तालुक्यात, स्वामी विवेकानंद नागरी पतसंस्था, मल्टीस्टेट, लोकमंगल सुपर बाजार अक्कलकोट आदी ठिकाणी माहिती केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे.
या विवाह सोहळ्यात नोंदणी केलेल्या वधू-वरास विवाहाचे कपडे, वऱ्हाडी मंडळीच्या भोजनाची सोय, स्वतंत्र मेकअप करण्याची व्यवस्था, वधूस मणी मंगळसूत्र व जोडवे देण्यात येतात. ताट, वाटी, ग्लास प्रत्येकी 5 नग, स्टील हंडा, स्टील डबा, तांब्या आदी संसारोपयोगी साहित्य दिले जाते. वधू- वरांची अक्कलकोट शहरातून मार्गावरून वरात काढली जाते. प्रत्येकाच्या धर्माप्रमाणे विवाह लावून दिले जातात. नवदाम्पत्यांना संसाराबद्दल योग्य समुपदेशन वैद्यकीय मार्गदर्शन केले जाते. सुखी संसारातून पहिली मुलगी जन्मात आल्यास मुलीच्या नावे २००० ची ठेव पावती देण्यात येते. विवाह सोहळा शिस्तबद्ध सुरेखरीतीने पार पडण्यासाठी प्रतिष्ठानच्या सदस्यांची वेगवेगळे समिती गठीत केल्या जातात त्याप्रमाणे प्रतिष्ठानचे सर्व सदस्य कार्य करीत असतात.
तरी या विवाह सोहळ्यामध्ये जास्तीत जास्त विवाह इच्छुकांनी नोंदणी करावी असे आवाहन विवेकानंद प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे. विवाह नाव नोदणी अंतिम दिनांक 20 मार्च 24 पर्यंत असेल. नाव नोंदणीसाठी विवेकानंद प्रतिष्ठान कार्यालय, मेन रोड,अक्कलकोट येथे संपर्क करावेत.
या पत्रकार परिषदेस मल्लिकार्जुन मसुती,अशोक येणगुरे, विलास कोरे, गुरुपादप्पा आळगी, नितीन पाटील, निनाद शहा, विक्रम शिंदे, निनाद शहा, महेश कापसे, अमोल कोकाटे,संतोष जिरोळे, राजशेखर उबराणीकर, मनोज कल्याणशेट्टी,शिवशरण जोजन, निरंजन शहा, सचिन गडसिंग, राजकुमार झिंगाडे, प्रकाश पाटील, ऋषिकेश लोणारी,शरणू कापसे, अशपाक शेख,सिद्धाराम टाके, जगन्नाथ चौधरी, चंद्रकांत दसले याच्या सह प्रतिष्ठान सदस्य उपस्थित होते.