आ.कल्याणशेट्टी- तानवडेचे बावनकुळे यांच्या उपस्थितीत मनोमिलन
शिरवळ ( हणमंत घोदे )
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बुधवारी झालेल्या दौऱ्यात अनेक राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या आहे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला भाजपमध्ये जाणाऱ्या अनेक इच्छुकांनी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची भेट घेतली.
यातच बावनकुळे यांनी उदय पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्याठिकाणी अक्कलकोट मधील जिल्हा परिषदेचे माजी पक्षनेते आनंद तानवडे व महेश हिंडोळे यांनी प्रदेशाध्यक्षांची भेट घेऊन सन्मान केला. तिथे अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी उपस्थित होते. यावेळी तानवडे यांना “आनंदराव लवकरच तुमच्यावर पक्षाकडून मोठी जबाबदारी देण्यात येणार आहे. आता अक्कलकोट मध्ये आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या सोबतीने काम करा” अशा सूचना बावनकुळे यांनी दिल्या आहेत.
दरम्यान या प्रकरणी आनंद तानवडे यांची प्रतिक्रिया घेतली असता पक्ष देईल ती जबाबदारी आपण प्रामाणिकपणे पार पाडू आगामी लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला अक्कलकोट तालुक्यातून भरघोस मते देण्यासाठी आमदार कल्याणशेट्टी यांच्या सोबतीने माझा प्रयत्न राहील.