आचेगांव येथे भीमा कोरेगांव शौर्यदिनानिमित्त मानवंदना
आचेगांव (बलवान गोतसुर्वे ):- आचेगांव ता. दक्षिण सोलापूर तथागत बुद्धविहार व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाच्या वतीने १जानेवारी १८१८ला ५०० तत्कालीन महार सैनिकांनी भीमा कोरेगांव लढाई जिंकून दिल्या बद्दल पुणे जिल्ह्यातील कोरेगांव भीमा येथे ब्रिटिशांनी उभा केलेल्या विजयीस्तंभाची प्रतिकृती आचेगांव येथे उभारून त्यास मानवंदना देण्यात आली.
प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन निवृत्त लोहमार्ग ऐ.एस.आय जगन्नाथ गोतसुर्वे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विकास गोतसुर्वे यांनी भीमा कोरेगांव विजयस्तंभाची माहिती सांगताना कोरेगांव भीमा येथील भीमा नदीच्या काठावर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी व पेशवाई मध्ये झालेल्या लढाईत पेशवाई काळात अस्पृश्यतेचे पालन मोठया प्रमाणात होत होते व त्यांना अत्यंत हिन दर्जाची वागणूक दिली जात होती याचा विरोध म्हणून आत्मसन्माना साठी पेशवाई च्या विरोधात ब्रिटिशांच्या बाजूने 500 तत्कालीन महारांनी २८००० पेशवाई सैनिकांसोबत युद्ध करून ऐत्याहासिक लढाई जिंकून दिली.त्या प्रित्यर्थ ब्रिटिशांनी त्या ५००शूरवीर सैनिकांच्या योगदानाबद्दल त्यांना मानवंदना म्हणून विजयीस्तंभ उभा केल्याचे सांगितले. यावेळी रिपाई नेते विकास सुर्वे, जगन्नाथ सुर्वे,सोलापूर भाजपा अनु जाती जिल्हा सरचिटणीस बलवान गोतसुर्वे, वंचित आघाडीचे कार्यकर्ते कपिल गोतसुर्वे, जयंती उत्सव अध्यक्ष विशाल गोतसुर्वे या सह राहुल नवगिरे,कटेप्पा घटकांबळे, जालिंदर गोतसुर्वे,प्रदीप गोतसुर्वे, मारुती गोतसुर्वे,कमृद्दीन बिराजदार, शावरसिद्ध कांबळे,सुधाकर गोतसुर्वे अविनाश वाघमारे,भारत सोनकांबळे, भारत गोतसुर्वे, मनोज गोतसुर्वे, लखन बनसोडे आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशाल गोतसुर्वे, कपिल गोतसुर्वे, हर्षद सुर्वे, शरद गोतसुर्वे, चेतन कांबळे, प्रदीप गोतसुर्वे अक्षय नवगिरे यांनी परिश्रम केले. यावेळी बहुसंख्येने आंबेडकरी अनुयायी उपस्थित होते.