2 C
New York
Saturday, December 7, 2024

Buy now

spot_img

नवीन वर्षाचे स्वागत आणि संस्कृती

नवीन वर्षाचे स्वागत आणि संस्कृती

31 डिसेंबर जसजसा जवळ येतोय त्याआधीच साधारणपणे महिनाभरापूर्वीच विकेंड सेलिब्रेशन पार्ट्या यांची जय्यत तयारी चालू असते .कुठे जायचे ? काय करायचे ?कसं साजरा करायचं ? या सर्वांचं नियोजन आजची आधुनिक पिढी ज्यांना पाश्चिमात्य संस्कृतीचे भयंकर वेड आहे (आभासी जगाचं )यांच चालू असतं . 31 डिसेंबरच्या रात्रीचे बारा वाजले की जोरात मोठ्या आवाजाचे फटाके फोडले जातात . मदयधुंद लोक व्यसनाधीन संस्कृतीचं ओंगळवाण प्रदर्शन करताना दिसतात . रात्रीच्या बेरात्री बेधुंदपणे बेजबाबदारपणे रस्त्यावर आरडाओरडा करत बेफिकीरपणे गाड्या चालवत निष्पापांचे बळी घेताना दिसतात . कित्येक धनदांडग्यांची पैसेरी संस्कारांन वाढलेली मुलं याशिवाय चैन म्हणून नववर्षा कडे पाहणारे लोक , फॅशन प्रवाहाच्या विळख्यात अडकलेले गोरगरीब सुद्धा बेजाबबदारपणे संस्कारहीनतने वागताना दिसतात . अमुक ठिकाणी पोलिसांनी छापा मारला अमुक ची मुलगी तमुकचा मुलगा, इथे अपघात तिथे , अपघात थर्टी फर्स्ट पार्टीच्या नावाखाली ब्रेकिंग न्यूज झळकताना आपण पाहतो . अरेरे !काय हे ! संस्कारच नाहीत, स्वातंत्र्य जास्त झालयं , पैसेवाल्यांची मस्ती असे निरर्थक वाचाळ करून आपण बातम्या पाहून सोडून देतो . पण आपण भारतीय कधी या आभासी संस्कृतीच्या विळख्यातून बाहेर येणार ? आपल्या संस्कृतीला पायदळी तुडवणार ?

वरचा मथळा वाचून बऱ्याच जणांच्या भुवया उंचावल्या असतील . काय हे ? मग आम्ही नवीन वर्षाचे स्वागत करायचं नाही का ? तर असं अगदीच नाही बरोबर आहे आपण नवीन वर्षाचे स्वागत केलेच पाहिजे .पण आपण भारतीय आहोत आपल्या ला एक सांस्कृतिक वारसा मिळालेला आहे .आपण आपल्या संस्कृतीत आणि संस्कारात चांगल्या संकल्पनाने स्वागत केले पाहिजे . रात्रीचे बारा वाजता फटाके फोडून नाच गाणे मोठमोठ्याने आरडाओरडा करून मित्रांच्या झोपेचं खोबरं करून नव्हे , मदयधुंद होऊन वाहने चालवून अपघात करून निष्पापांचा बळी घेऊन तर नक्कीच नाही . घरच्यांशी खोटे बोलून साजरा करणे नव्हे . केक कापून एकमेकांच्या तोंडावर फासणं आणि अन्नाचा अपव्यय करणे . जे रस्ते ज्या सार्वजनिक भिंती या सार्वजनिक ठिकाणी नको ते संदेश लिहून आपल्या संस्कारांचा संस्कृतीचा आणि सार्वजनिक मालमत्तेचा विद्रूप पणा करणे म्हणजे नवीन वर्ष साजरा करणे नव्हे . रात्री पहाटेपर्यंत धिंगाणा घालून एक जानेवारीला जेलमध्ये किंवा घरी सकाळी दहा दहा वाजेपर्यंत झोपणे हे नवीन वर्षाचे स्वागत सुजलेल्या लालसर तारवटलेल्या डोळ्यांने आपण करणं योग्य आहे का ? झोपमोड झालेल्यांच्या शिव्या शाप खाणं हे आहे का नवीन वर्षाचे स्वागत !डोळे सुजवून नवीन वर्षाचे स्वागत मान्य आहे का ?

मान्य आहे आपण सर्व भारतीयांचे सर्व दैनंदिन व्यवहार इंग्रजी महिन्याप्रमाणे चालतात किंबहुना आपण सर्व ठिकाणी याच तारखांचा वापर करतो . हे आपण स्वीकारलेल आहे . तेवढेच काय, त्यातल्या त्यात आपण तर महाराष्ट्रीयन, मराठीचा अभिमान बाळगणारे . आपल्यापैकी किती जणांना स्वतःची जन्मतारीख मुलांच्या जन्मतारखा लग्नाचा वाढदिवस या तारखा इंग्रजी महिन्यांच्या तारखेप्रमाणे तोंडपाठ असणारे आपण याच तारखा मराठी महिन्याप्रमाणे सांगू शकतो का ? कमीत कमी माहिती तरी आहेत का ?तर नाहीऽ ऽ हेच सर्वांच उत्तर असणार आहे . मग वैचारिक बाब अशी की पश्चिमात्यांची तयारी महिना महिना करतो तेव्हा आपलं स्वतःचं मूळचं सर्व काही विसरून जातो . पहा पटतंय का नवीन गोष्ट स्वीकारत असताना जुनं सुद्धा सोबत घ्यायलाच हवं .

मराठी महिन्याचे स्वागत जसं आपण गुढी उभारून करतो तसेच इंग्रजी महिन्याचे स्वागत सुद्धा एखाद्या धार्मिक सामाजिक कौटुंबिक हिताच्या कार्याने करावं . विचारात घेण्याची बाब आहे का नाही पहा एक जानेवारी चे स्वागत आई-वडिलांचे चरण धुवून त्यांच्या आशीर्वादाने करावे म्हणजे वृद्धाश्रम ही संकल्पना नष्ट होईल .

नववर्षाचे स्वागत अन्नदान करून करावे . गरजवंतांना दानधर्म करून करावे . कुटुंबासमवेत पूजा अर्चा ध्यान मनन गप्पा करून करावे . एखादा स्वच्छतेचा ,अंधश्रद्धा निर्मूलनासाठीचा , वृक्ष लागवडीचा ,ऐतिहासिक किल्ले वास्तू राजवाडे यांच्या जिर्णोद्धाराचा करून करावे . अनाथ आश्रमांना भेटी देऊन मदतीचा हात द्यावा . उंच ध्येय स्वप्न पूर्ण करण्याचा संकल्प करावा . एखाद्या सरकारी शाळेतील मुलांच्या चेहऱ्यावर हास्य आणणारा उपक्रम हाती घ्यावा .

स्वराज्य निर्माणकरून स्वाभिमानाने जगण्याचा हक्क देणारे छत्रपतींचा शिवाजी महाराजांचा इतिहास त्यांचे जीवन चरित्र अभ्यासावं .शिक्षण आणि समाजाचे परिवर्तन घडवून आणणाऱ्या फुले दांपत्यांचा इतिहास अभ्यासावा . लोकशाहीने स्वतःच अस्तित्व सिद्ध करणाऱ्या आंबेडकरांचा इतिहास वाचावा . संयमाने आणि सत्याने इंग्रजांशी प्रखर लढा देणाऱ्या महात्मा गांधीजींचा इतिहास अभ्यासावा . ध्येयाने आणि समाजकार्याच्या विचाराने प्रेरित होणाऱ्या भगतसिंगांचा इतिहासात अभ्यासावा .शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या नेताजी सुभाष चंद्र बोस यांचे चरित्र अभ्यासावं अशा महान कार्य करणाऱ्या प्रेरणास्त्रोतांचे चरित्र पारायणे लावावीत ही चरित्रे आहे त आपली भारतीय संस्कृती आणि परंपरा . हे आहेत आपल्या विकसित भारताचा पाया . नववर्षाच्या निमित्ताने हा पाया भक्कम करणे गरजेचे आहे . म्हणजे विकसित भारताची प्रगत इमारत उभी राहील.

थोरा मोठ्यांच्या समाज सुधारकांच्या क्रांतिकारकांच्या जीवन चरित्रांचे वाचन त्यांच्या जीवनाचे पारायण लावावे . देशभक्ती ची नाटके एकांकिका पोवाडा यांच्या कार्यक्रमांचे आयोजन करून करावे . म्हणजे दुग्धशर्करा योग होईल . संस्कृतीचे जतन व संक्रमण तर होईलच आणि नवीन वर्षाचे स्वागतही होईल .असं करून पहा किती गौरवपूर्ण जेणेकरून नवीन वर्षाच्या स्वागता सोबतच आपल्या भारतीय संस्कृतीचे जतन संवर्धन चालेल . चालीरीती परंपरेचे संस्कारांचे संवर्धनही होईल व नवीन वर्षाच्या स्वागताचा आनंदही होईल . आपला वेगळा भारत वेगळी ओळख वेगळा संकल्प यामध्ये आनंदाची देवाण-घेवाण होईल आणि नव स्वीकारताना जुनं ही सोबत राहील .

मुळात म्हणजे जे आता सध्या नवीन वर्षाचं किती गौरवपूर्ण स्वाभिमानानं अभिमानाने जागृत करणारे कार्य होईल .आणि हे काळाची गरज आहे . कारण आज काल सर्व शिकवणारे क्लासेस आहेत युट्युब लिंक आहेत .पण परिवर्तन संस्कृती संस्कार यांचे क्लासेस अजून तरी नाहीत आणि नसतीलही .आणि सर्वात मोठे सत्य म्हणजे या गोष्टी विकत मिळत नाहीत . त्या अनुभवनं जपणं आणि वाढवणं गरजेचं असतं . तरच आपण सुसंस्कार व आपली भारतीय संस्कृती जतन संवर्धन आणि संक्रमण करू शकतो . विचारधन विचाराधीन होण्याची गरज आहे गतवर्षातील घडामोडी उजळणी सुखदुःख चांगले वाईट अनुभव यातून आपण काय व कोणत्या गोष्टी घेऊन त्यांचे अवलोकन करून नवीन वर्षात पदार्पण करावं हे गरजेचे आहे .कुठेतरी ढाब्यावर हॉटेलात नवीन वर्षाचे स्वागत करून संस्कृतीचे प्रदर्शन करणे कोणालाच पटणारं नाही .भारतीय संस्कृती परंपरा आपल्याला सतत एकच सांगतात आमची शाखा कुठेही नाही ! यावरूनच आपण ओळखून घ्यायचं ते जतन करण किती आवश्यक आहे .

 

श्रीमती रिंकू अनंतराव जाधवर (धस )
विषयशिक्षिका – जि.प .प्रा म शाळा उमरगे
ता . अक्कलकोट जि. सोलापूर
Mob.9403449285

- Advertisement -spot_img

Related Articles

Latest Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img