विद्यार्थ्याने वैज्ञानिक दृष्टिकोन जपला पाहिजे : डॉ. राजाभाऊ भैलुमे
पुणे : ( प्रतिनीधी ) विद्यार्थीदशेतील विद्यार्थ्यांनी आपली समाजाप्रती असलेली बांधिलकी जपायला हवी, त्याचप्रमाणे विद्यार्थ्याने वैज्ञानिक दृष्टिकोन जपला पाहिजे असे प्रतिपादन डॉ. राजाभाऊ भैलुमे यांनी केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या सावित्रीबाई फुले जयंती उत्सवात ते बोलत होते.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त लोक शास्त्र सावित्री हे लोकप्रिय नाटक आयोजित करण्यात आले होते यावेळी स्पर्धा परीक्षा पुस्तके वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय कुलसचिव डॉ विजय खरे, यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून मराठी विभाप्रमुख आदरणीय तुकाराम रोंगटे सर यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रस्ताविक सागर सोनकांबळे यांनी मांडत असताना म्हणाले की शिक्षणाबरोबर सामाजिक बांधिलकी जपणे आपले कर्तव्य आहे महापुरुषांनी सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी त्याग बलिदान संघर्ष केले त्यांचे विचार तळागाळापर्यंत पोहचवने हे आपले आद्य कर्तव्य आहे,यासाठी हा कार्यक्रम आपण आयोजित केला आहे यावेळी डाप्साचे अध्यक्ष अमोल सरवदे, अक्षय कांबळे ,राहुल ससाणे, गोंदण प्रकाशनचे प्रमुख अनिल पवळ, रामदास वाघमारे, जयकर गायकवाड , दादाराव गायकवाड सरपंच मुन्ना अरडे, छाया कविरे, रुकसना शेख, मयुर जावळे, दगडू सोनकांबळे, पत्रकार आकाश भोसले, रविराज कांबळे विशाल कांबळे, बापूराव घुगरगावकर ,समाधान दुपार गुडे, सिद्धांत जांभूळकर,बालाजी मिसाळ,शकील शेख ,गणेश गायकवाड, प्रशांत शिंदे उपस्थित होते. विशेष करून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांने मोलाचे योगदान दिले त्याचं प्रमाणे विविध विभागातील विद्यार्थी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निकिता सिधगनेश,स्वाती सातपुते,मिरा यांनी केले तर आभार सोमनाथ अंभुरे यांनी केले.