पत्रकारांनी धावपळीच्या जीवनात स्वतःची काळजी घेणे गरजेचे – चेअरमन महेश इंगळे
म.रा.मराठी पत्रकार संघ व ग्रामीण रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने पत्रकारांचा आरोग्य तपासणी
अक्कलकोट / प्रतिनिधी
पत्रकारांनी आपल्या धावपळीच्या जीवनामध्ये स्वतःबरोबर स्वतःच्या कुटुंबांची आरोग्याची काळजी घेणे
काळाची गरज आहे, किमान चार महिन्यातून एकदा नियमित आरोग्य तपासणी करून घेण्याचे आवाहन अक्कलकोट वटवृक्ष श्री स्वामी समर्थ देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांनी केले
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतरावजी मुंडे,प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे व बाळशास्त्री जांभेकर,पत्रकार दिनाच्या औचित साधून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व ग्रामीण रुग्णालय अक्कलकोट यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण रुग्णालय येथे पत्रकारांचा आरोग्य तपासणी करण्यात आले होते, त्याप्रसंगी चेअरमन महेश इंगळे हे बोलत होते.
तत्पूर्वी श्री स्वामी समर्थ महाराजांचा व बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वटवृक्ष श्री स्वामी समर्थ देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे हे होते व्यासपिठावर सरपंच संघटना तालुकाध्यक्ष प्रदीप जगताप, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष कमलाकर सोनकांबळे, पं.स.सदस्य राजेंद्र बंदीछोडे, उपस्थित होते
यावेळी बोलताना डॉ.रवींद्र बनसोडे म्हणाले की, लोकशाहीच्या चार स्तंभा पैकी एक स्तंभ पत्रकार आहे.पत्रकारामुळे सर्वसामान्यांना न्याय मिळतो त्यामुळे पत्रकारांचे महत्त्व अबाधित आहे.म्हणुन पत्रकारांनी स्वतः व स्वतःबरोबर आपल्या कुटुंबीयांची आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.वेळोवेळी आरोग्य तपासणी करून घ्यावे.रुग्णालय आपल्या सर्वांसाठी सर्वतोपरी सहकार्य करेल असे आश्वासन त्यांनी यावेळी बोलताना दिले.
यावेळी पत्रकार गौतम बाळशंकर बोलताना म्हणाले की, लोकशाही मध्ये पत्रकारितेचे महत्व खूप आहे सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून देण्याचे ताकद पत्रकारितेमध्ये आहे पत्रकारांनी गुलामी न करता समाजामध्ये अन्याय घडत असेल तर आवाज उठवून न्याय मिळेपर्यंत लढा दिले पाहिजे
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष कमलाकर सोनकांबळे,सचिव विश्वनाथ चव्हाण,राजेश जगताप,बसवराज बिराजदार, रमेश भंडारी, गौतम बाळशंकर,निगंप्पा निंबाळ,समाधान अहिरे, गणेश भालेराव या सर्व पत्रकारांचा सन्मान देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे व डॉ.रवींद्र बनसोडे , प्रदीप जगताप यांनी केले..
या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ता जयभाऊ पारखे,महादेव सोनकवडे,शाम बाबर, राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्ष माया जाधव,
डॉ.नदाफ,पी एस गवंडी,पाटोळे,करजगीकर, धर्मसाळे,सुनील केरुर,बंदपट्टे,रेणू चव्हाण आदीसह ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.
प्रदेश अध्यक्ष वसंतराव मुंडे,प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे व पत्रकार दिनाच्या अवचित साधून म.रा.मराठी पत्रकार संघ व ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकारांचा अक्कलकोट ग्रामीण रुग्णालय येथे,ईसीजी,शुगर,बीपी,डोळे तपासणी,नाक, कान,घसा,हिमोग्लोबिन व विविध आजारावरील तपासणी करण्यात आले आहे
कमलाकर सोनकांबळे, तालुकाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई