-3.2 C
New York
Wednesday, January 15, 2025

Buy now

spot_img
spot_img

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने अक्कलकोट येथे राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने अक्कलकोट येथे राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी

अक्कलकोट ( प्रतिनीधी )अक्कलकोट येथील राजमाता जिजाऊ मंगल कार्यालय बॅगेहल्ली रोड येथे बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा संस्थापक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर या राष्ट्रीय संस्थेच्या वतीने वरील ठिकाणी राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली यावेळी संस्थेच्या वतीने दैनिक यशसिद्धी संपादक कमलाकर सोनकांबळे, पत्रकार स्वामीराव गायकवाड, पत्रकार विश्वनाथ चव्हाण, पत्रकार राजेश जगताप यांचा मानाचा फेटा मायेची शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी भारतीय बौद्ध महासभाचे कॅलेंडर 2024 चे प्रकाशन सर्व पत्रकार व सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी तालुका प्रवक्ता राजकुमार बनसोडे सर यांनी प्रस्तावना मांडली व संस्थेचे 10 उद्दिष्टे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मल्टी कॉपरेटिव्ह बँकेचे शेअर्स घेण्याबद्दल सर्वांना सांगितले व सर्व सविस्तर माहिती दिली यावेळी जिल्हा उपाध्यक्ष मेजर कमलाकर कांबळे जिल्हा प्रवक्ता दिलीप कदम जिल्हा संघटक सिद्धाराम घटकांबळे तालुकाध्यक्ष दत्ता कांबळे तालुका खजिनदार श्रीशैल शिवशरण तालुका संस्कार प्रमुख आकाश गायकवाड शहर सदस्य अनिल बनसोडे फोटोग्राफर सुरेश जगताप, शाम बाबर,धर्मा शिंगे सामाजिक कार्यकर्ता दुधनी मल्लिकार्जुन सोनकांबळे ग्रामपंचायत सदस्य भोसगा रमेश धोडमणी सरपंच आंदेवाडी शिवशंकर गुंजले सामाजिक कार्यकर्ते आधी सह संस्थेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी संस्थेच्या वतीने तालुकाध्यक्ष दत्ता कांबळे यांनी सर्वांच्या आभार मानले

- Advertisement -spot_img
spot_img

Related Articles

Latest Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img