आमच्या समाजावर कोणी अन्याय करत असेल तर त्यांना धडा शिकविल्या शिवाय सोडणार नाही : राहुल सरवदे
अक्कलकोट ( विशेष प्रतिनीधी ) अक्कलकोट येथील भिमनगर आणि दुसऱ्या समाजात जे भांडण झाल्यानंतर पोलीस प्रशासन राजकीय दबावापोटी कुणाचं तरी ऐकून दोन समाजात भांडण झालेलं असताना दोन्ही समाजातील मुलांवर गुन्हे दाखल झालेले असताना सुद्धा अक्कलकोट येथील पोलीस प्रशासन जाणून बुजून रात्री अपरात्री भीमनगर येथील स्त्री-पुरुष यांना धरपकड करणे आणि भीमनगर समाजाची केस दाखल करून न घेणे अशा रीतीने एकंदर भीमनगर समाजाला टार्गेट करून त्याच्यावर अन्याय या ठिकाणी प्रशासन करीत असल्याचे दिसून येत आहे आणि गुन्ह्यात नसलेल्या मुलांनाही पोलीस अटक करत आहेत हे बाब चुकीचं असून त्याविरोधात आम्ही सर्व मिळून लढू आमच्या समाजावर कोणी अन्याय करत असेल तर त्यांना धडा शिकविल्या शिवाय सोडणार नाही असे राहुल सरवदे यांनी भीमनगर अक्कलकोट येथे भेट देऊन समाज बांधवांशी बोलताना सांगितले
बहुजन समाज पार्टीचे केंद्रीय सचिव राहुल सरवदे, सोलापूर जील्हातील नामवंत विधीतज्ज्ञ, वेळो वेळी समाजाच्या बाजूने उभे असणारे जेष्ठ वकील संजीव सदाफुले, नगरसेवक व कामगार नेते अशोक जानराव यांनी अक्कलकोट भीमनगर या ठिकाणी भेट देऊन समाजच्या भावना व्यथा दुःख ऐकून आम्ही समाजाच्या सोबत आहोत तुम्ही घाबरून जाऊ नका अशा धीर दिले, यावेळी बोलताना अँड. संजीव सदाफुले यांनी म्हणाले की, आपली मूल सुखरूप बाहेर येतील त्याची जिम्मेदारी माझी राहील आणि समाजाची केस मी स्वता लढेन , यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अक्कलकोट तालुकाध्यक्ष अविनाश मडीखांबे, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे, तालुकाध्यक्ष विठ्ठल आरेनवरु , रत्नाकर गायकवाड, विकी बाबा चौधरी यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते